महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Patanjali ZOOM Meeting: पतंजलीच्या झूम मिटिंगमध्ये अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ.. महाराष्ट्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल - महाराष्ट्रातील व्यक्तीवर पतंजलीकडून गुन्हा

Patanjali ZOOM Meeting: झूम अॅपच्या माध्यमातून पतंजली योगपीठात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक सुरू होती, त्यानंतर 10 मिनिटे अश्लील व्हिडिओ सुरू OBSCENE VIDEO DURING ZOOM MEETING झाले. या संदर्भात पतंजली योगपीठाच्या तांत्रिक प्रमुखाने महाराष्ट्रातील व्यक्तीविरुद्ध बहादराबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. PATANJALI FILES CASE AGAINST MAHARASHTRA MAN

PATANJALI FILES CASE AGAINST MAHARASHTRA MAN FOR PLAYING OBSCENE VIDEO DURING ZOOM MEETING
पतंजलीच्या झूम मिटिंगमध्ये अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ.. महाराष्ट्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

By

Published : Dec 18, 2022, 7:40 PM IST

हरिद्वार (उत्तराखंड): Patanjali ZOOM Meeting: झूम अॅपवर सुरू असलेल्या बैठकीदरम्यान अश्लील व्हिडिओ OBSCENE VIDEO DURING ZOOM MEETING दाखवल्याप्रकरणी पतंजली योगपीठाच्या तांत्रिक प्रमुखाने महाराष्ट्रातील एका व्यक्तीविरुद्ध बहादराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. PATANJALI FILES CASE AGAINST MAHARASHTRA MAN

बहादराबाद पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० दिवसांपूर्वी झूम अॅपच्या माध्यमातून पतंजली योगपीठात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक सुरू होती. बैठकीत अधिकाऱ्यांशी कामाबाबत चर्चा सुरू होती, त्याच दरम्यान, महाराष्ट्रातील एका तरुणाने ऑनलाईन बैठकीदरम्यानच एक अश्लील व्हिडीओ चालवला, ज्यामुळे बैठकीत उपस्थित सर्वांमध्ये खळबळ उडाली.

हा व्हिडीओ काही काळ चालल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पतंजलीचे तांत्रिक प्रमुख करण भदोरिया यांनी याप्रकरणी बहादराबाद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे. तब्बल दहा दिवस चाललेल्या तपासानंतर अखेर रविवारी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details