नवी दिल्ली : अग्निवीरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात सामील होणार आहे. यानिमित्त आयएनएस चिल्का येथे पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार प्रमुख पाहुणे असणार आहेत. पहिल्या तुकडीतील 273 महिलांसह सुमारे 2600 अग्निवीरांना यशस्वी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना देशाच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल.
273 महिला अग्निवीरांचा समावेश : मिळालेल्या माहितीनुसार, महिला अग्निवीर आयएनएस चिल्क येथे प्रशिक्षण घेत होत्या. सुमारे 2600 अग्निवीरांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 273 महिला अग्निवीरांचा समावेश आहे. आजच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होणारे अग्निवीर प्रथमच लष्करात आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडसाठी आयएनएस चिल्का येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पासिंग आऊट परेडचे आयोजन :सूर्यास्तानंतर परडचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पासिंग आऊट परेडचा आढावा घेणारे अधिकारी हे नौदल प्रमुख असतील. या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित राहणार आहेत. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवरही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. पासिंग आऊट परेडनंतर अग्निवीर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात केले जातील.
गेल्या वर्षी अग्निवीर योजना अस्तित्वात आली : लष्करातील अग्निवीर योजना गेल्या वर्षी प्रत्यक्षात अस्तित्वात आली होती. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र या योजनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. काही लोकांनी या योजनेची चुकीची माहिती दिल्याने तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या. नव्या तरतूदीनुसार आता बीएसएफमध्ये देखील भरतीसाठी माजी अग्निवीरांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :President visit to Bengal: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर, रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयाला भेट देणार