महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Passenger's Phone Catches Fire : इंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाच्या फोनला आग; मोठी दुर्घटना टळली

फ्लाइट 6E 2037 दिब्रुगडहून दिल्लीच्या दिशेने जात असताना केबिन क्रू सदस्याला प्रवाशाच्या फोनमधून ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. त्यानंतर केबिन क्रू सदस्याने अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विझवली. गुरुवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास हे विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडिगो फ्लाइट
इंडिगो फ्लाइट

By

Published : Apr 15, 2022, 9:37 AM IST

नवी दिल्ली -गुरुवारी इंडिगोच्या दिब्रुगड-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाच्या मोबाईलला हवेत आग लागली. परंतु केबिन कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत अग्निशामक यंत्राने ती आग विझवली, असे विमान वाहतूक नियामक महासंचालनालय (DGCA) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा -Road Accident in Jodhpur : ट्रक-बोलेरोचा अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

मोबाईलमधून निघाला धूर - फ्लाइट 6E 2037 दिब्रुगडहून दिल्लीच्या दिशेने जात असताना केबिन क्रू सदस्याला प्रवाशाच्या फोनमधून ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. त्यानंतर केबिन क्रू सदस्याने अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विझवली. गुरुवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास हे विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, "दिब्रुगढ ते दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट 6E 2037 मध्ये मोबाईल डिव्हाईसमधून धूर आल्याची घटना घडली होती. क्रु सदस्यांना धोकादायक घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते आणि त्यांनी त्वरीत ही परिस्थिती हाताळली. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. तसेच विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details