महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय

केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. देशात एका दिवसात जेवढे कोरोना रुग्ण सापडताहेत, त्यातील 50टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. मध्य प्रदेश सरकारने 21 मार्च ते 31 मार्च या कालावधीत महाराष्ट्रातून येणाऱया प्रवासी बसेस आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवासी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Mar 19, 2021, 1:09 PM IST

Updated : Mar 19, 2021, 1:40 PM IST

मध्य प्रदेश सरकारचा कठोर निर्णय; महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसवर बंदी
मध्य प्रदेश सरकारचा कठोर निर्णय; महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसवर बंदी

भोपाळ -कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कठोर पावले उचलली आहेत. 21 मार्च ते 31 मार्च या कालावधीत महाराष्ट्रातून येणाऱया प्रवासी बसेस आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवासी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाविषयी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ज्यात जिल्हाधिकारी, आयुक्त आणि सीएमएचओ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

डिंडोरी जिल्हाधिकाऱयांनी महाराष्ट्रातून जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांना प्रवासाच्या 72 तासापूर्वी कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी परिवहन विभागाने आदेश जारी केले आहेत. त्याचवेळी सीएम शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱयांना अनेक सूचनाही दिल्या.

मध्य प्रदेश सरकारचा कठोर निर्णय; महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसवर बंदी

दिंडोरी जिल्हाधिकारी रत्नाकर झा यांनी गुरुवारी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कलम 144 अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांना 7 दिवस अलग ठेवण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मास्क न घालणाऱ्यावर कडक -

सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न घालणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. बंद हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये क्षमतापेक्षा 50 टक्के पर्यंत गर्दी जमविण्यास परवानगी दिली जाईल. तर मैदानांच्या आकारानुसार खुल्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी एसडीएमकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल, असा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार -

कोरोनाबाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. देशात एका दिवसात जेवढे कोरोना रुग्ण सापडताहेत, त्यातील 50टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय अशी भीती व्यक्त होते आहे.

हेही वाचा -राज्यातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; एकट्या नागपुरात 23 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 19, 2021, 1:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details