कोल्लम (केरळ) -निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे प्रयोग केल्याची अशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. डिसेंबर 2020मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान, मास्कवर पक्षाची चिन्हे छापणे, हा एक ट्रेंड झाला होता. यानंतर आता आणखी एक प्रयोग समोर आला आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचा फोटो हा चक्क डोसा या खाद्यपदार्थावर काढला जात आहे. कोल्लम जिल्ह्यातील डोसा शॉपवर हा प्रयोग करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्लम बीच रस्त्यावरील हा प्रयोग लोकांना आकर्षित करत आहे.
हेही वाचा -उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह!
डोशावर काय?
कोयता (सिकल), हातोडी (हॅमर), चांदणी (स्टार), हाताचा पंजा, अशा प्रकारचे पक्षाचे चिन्ह डोशावर उतारण्यात येत आहे. टोमॅटो सॉस, गाजर आणि अंड्यातील बलक मिसळून हा डोसा लोखंडाच्या तव्यावर बनविण्यात येत आहे. मागणीनुसार, पक्षाच्या चिन्हासोबतच उमेदवारांचे चेहरेही उतारण्यात येत आहे.