- लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 पर्यंत स्थगित
Parliament Monsoon Session Live Updates : लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11पर्यंत स्थगित - #MonsoonSession
15:43 July 19
15:40 July 19
- लोकसभेत पेगाससच्या मुद्यावर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण देत तर सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले.
15:34 July 19
- लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू
14:38 July 19
- विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 3.30पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 3पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
12:59 July 19
- विरोधीपक्षांनी राज्यसभेत गोंधळ घातल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले आहे.
11:37 July 19
- विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
10:39 July 19
- अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर माध्यमांना संबोधित केले. बाहुबली' होण्याचा एक मार्ग आहे. लस टोचवून घ्या, असे मोदी म्हणाले.
10:39 July 19
- राज्यसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे.
10:39 July 19
- लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आज दुपारी अडीच वाजता होणार आहे.
10:39 July 19
- केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस आज लोकसभेत राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयक, २०२० सादर करतील.
10:10 July 19
- पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढल्याच्या निषेधार्थ तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार आज सायकलवरून संसदेत.
10:10 July 19
- काँग्रेसचे खासदार जसबीरसिंग गिल यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांबाबत स्थगन प्रस्ताव मांडला.
10:10 July 19
- आम आदमी पार्टीचे (खासदार) खासदार भगवंत मान यांनी केंद्र सरकारच्या शेती कायद्याबाबत सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
10:10 July 19
- राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यू आकडेवारीसंदर्भात नियम 267 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला.
10:10 July 19
- भाकपचे राज्यसभेचे खासदार बिनॉय विश्वाम यांनी पेगासस स्पायवेअरसंदर्भात नियम 267 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला.
10:10 July 19
- काँग्रेसचे खासदार मनिकम टैगोर यांनी इंधन दर वाढ आणि महागाईवर स्थगन प्रस्ताव मांडला.
10:10 July 19
- काँग्रेसचे लोकसभेचे खासदार मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांबाबत सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
09:50 July 19
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू
नवी दिल्ली - कोरोना महामारीत लोकसभेचे दुसरे पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच 19 जुलै रोजी सुरू होत आहे. या पावसाळी अधिवेशनात 31 विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, चीन सीमा वाद, लसीकरण, इस्रायली स्पायवेअर आणि इंधन वाढ आदी मुद्दे विरोधक उपस्थित करू शकतात. संसदेची एकूण 19 सत्रे होण्याची अपेक्षा असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश असेल. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल.