नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील गदारोळ होण्याची शक्यता आहे. तृणमुल पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी निलंबनाची शिफारस आचरण समितीने केल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांनी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तीन राज्यांत सत्ता आल्याने भाजपामध्ये उत्साह आहे.
Live Updates
- कर्जबुडव्यावर सरकारकडून कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले. 31 मार्च 2023 पर्यंत सरकारी बँकांनी एकूण 33,801 कोटी रुपये वसूल केले आहेत. 1 डिसेंबरपर्यंत ईडीने 15,186.64 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सकाळी इंडिया आघाडीच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या (एलओपी) दालनात सकाळी 10.00 वाजता बैठक घेण्यात आली.
सोमवारी दोन महत्त्वाची विधेयकं मंजूर-संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतीय न्याय विधेयक २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक असे महत्त्वाचे विधेयक मांडली जाणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आर्थिक स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेची सुरुवात राज्यसभेतील खासदार रामी रेड्डी, विरेंद्र प्रसाद बैश्य, घनश्याम तिवारी, लक्ष्मीकांत वाजपेयी, सुशील कुमार मोदी, आदित्य प्रसाद आणि शंभू शरण पटेल करण्याची शक्यता आहे. सोमवारी लोकसभेत अधिवक्ता दुरुस्ती विधेयक २०२३ मंजूर झाले. या विधेयकातून न्यायालयाच्या आवारातील दलालांचे काम संपवणे हे आहे. हे विधेयक राज्यसभेत मान्सूनच्या अधिवेशनात यापूर्वीच संमत झाले आहे. विधेयकातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीश दलालांची यादी तयार करून प्रकाशित करू शकतात.