महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, मोईत्रा यांची खासदारकी होणार रद्द? - भाजपा खासदार जरा केशरी देवी सिंह

Parliament Winter Session 2023 : संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू झालंय. हे सत्र 22 डिसेंबरपर्यंत चालणार असून 19 दिवसांत दोन्ही सभागृहात 15 बैठका होणार आहेत.

Parliament Winter Session 2023 fifth day
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 10:34 AM IST

Updated : Dec 8, 2023, 12:28 PM IST

नई दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (8 डिसेंबर) पाचवा दिवस आहे. आज तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील 'कॅश फॉर क्‍वेरी' आरोपांवरील नैतिक समितीचा अहवाल लोकसभेत सादर केला जाईल. दरम्यान, मतदानादरम्यान खासदारांचं संख्याबळ पूर्ण राहावं यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर) भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी 3 ओळींचा व्हीप जारी केला.

  • भाजपा खासदार जरा केशरी देवी सिंह आणि काँग्रेसच्या खासदार रजनी अशोकराव पाटील या आज राज्यसभेत परिवहन, पर्यटन आणि सांस्कृतीक विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा 360, 361, 362 आणि 363 वा अहवाल सादर करतील.
  • खासदार राम चंदर जांगडा आणि काँग्रेस खासदार जेबी माथेर हिसाम हे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंमलबजावणीच्या मूल्यमापनावर संसदीय स्थायी समितीच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारांच्या सतराव्या अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारसी आणि निरीक्षणांवर सरकारने केलेल्या कारवाईचा विसावा अहवाल सादर करतील.

मोईत्रा यांची हकालपट्टी केली जाईल? -गुरुवारी विरोधी सदस्यांनी मोईत्रासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शिफारशींवर चर्चा करावी, असं म्हटलं. तर पत्रकारांशी संवाद साधत असताना बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली म्हणाले की, ''जर अहवाल सादर झाला तर आम्ही सविस्तर चर्चेचा आग्रह धरू. कारण अवघ्या अडीच मिनिटांत अहवालाचा मसुदा स्वीकारण्यात आला." भाजपा खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीने 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत 'कॅश फॉर क्वेरी' या आरोपावरून मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. यावेळी समितीच्या सहा सदस्यांनी अहवालाच्या बाजूनं मतदान केलं. त्यात काँग्रेसच्या निलंबित खासदार प्रनीत कौर यांचाही समावेश आहे. तसंच यावेळी समितीच्या चार विरोधी सदस्यांनी अहवालावर मतमतांतरे नोंदवली होती. पण जर सभागृहाने पॅनेलच्या शिफारशीच्या बाजूने मत दिले तरच मोईत्रा यांची हकालपट्टी होऊ शकते.

हेही वाचा -

  1. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; 'या' मुद्द्यांवरुन अधिवेशन वादळी होण्याची शक्यता
  2. Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून होणार हकालपट्टी? आचरण समितीची शिफारस
  3. Cash For Query Allegation : खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, लोकसभेच्या आचरण समितीची आज बैठक
Last Updated : Dec 8, 2023, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details