नवी दिल्ली Parliament Winter Session २०२३ : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली होती. त्यावेळी संसदेत विरोधकांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. या प्रकरणानंतर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल 14 खासदारांचं निलंबन करण्यात येत असल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं.
विरोधकांचा गदारोळ :बुधवारी संसदेच्या सभागृहात दोन घुसखोर घुसल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून, आज देखील संसदेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी कतारमध्ये अडकलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना कधी परत आणणार, यावरुन लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली. तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली होती.
एकूण 14 खासदारांचं निलंबन : आज संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील एकूण 14 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. हे निलंबन हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत असणार आहे. यातील 13 खासदार हे लोकसभेतील आहेत, तर 1 खासदार हे राज्यसभेतील आहेत. खासदार डेरेक ओ ब्रायन यांचंही निलंबन करण्यात आलंय. या निलंबनानंतर विरोधकांना सरकारवर जोरदार टीका केली आहे.
निलंबित केलेले खासदार : 1. टीएन प्रथापन, काँग्रेस 2. हीबी एडेन, काँगेस 3. जोथिमनी, काँग्रेस 4. राम्या हरिदास, काँग्रेस 5. डीन कुरियाकोस, काँगेस 6. बेनी बेहनन, काँग्रेस 7. वी के श्रीकंदन, काँग्रेस 8. मोहम्मद जावेद, काँग्रेस 9. पीआर नटराजन, माकप 10. कनिमोई करुणानिधी, द्रमुक 11. के सुब्रमण्यन 12. एस वेंकटेशन, माकप 13. मणिकम टैगोर, काँग्रेस हे सर्व 13 खासदार हे लोकसभेचे आहेत. तर 15. डेरेक ओब्रायान (तृणमूल) हे राज्यसभेचे एक निलंबित खासदार आहेत.