महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Special Session : आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा', जाणून घ्या संपूर्ण तपशील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज आजपासून नवीन संसद भवनात होणार आहे. काल अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनात झाला. तेथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेशी संबंधीत अनेक आठवणींचा उल्लेख केला.

Parliament Special Session
Parliament Special Session

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 10:10 AM IST

Updated : Sep 19, 2023, 11:29 AM IST

नवी दिल्ली Parliament Special Session : सोमवार, १९ सप्टेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अधिवेशनाला नव्या संसद भवनातून सुरुवात होणार आहे. पाच दिवस चालणारे हे विशेष अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू झालं होतं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेला संबोधित केलं. आता दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कामकाजाचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. जाणून घेऊया

सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात : आज सकाळी साडेनऊ वाजता जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांचं फोटो सेशन झालं. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल. या दरम्यान संसदेच्या ऐतिहासिक वारशावर चर्चा करण्यात येणार आहे. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात येईल.

या खासदारांना बोलण्याची संधी :सेंट्रल हॉलमध्येलोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पीयूष गोयल, मेनका गांधी हे नेते बोलणार आहेत. नेत्यांच्या भाषणाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. तो दुपारी १२.३० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू होईल.

मोदी संविधानाची प्रत घेऊन नवीन संसद भवनात जाणार : पंतप्रधान मोदी संविधानाची प्रत घेऊन नवीन संसद भवनात जाणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर महिला आरक्षण विधेयकही संसदेत मांडलं जाऊ शकतं. सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष सत्राची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणानं झाली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उल्लेख केला. 'जुन्या संसद भवनाला निरोप देण्याचा क्षण भावनिक आहे. संसदेची जुनी इमारत सर्वांना प्रेरणा देत राहील', असं ते म्हणाले. संसदेची जुनी इमारत परदेशी राज्यकर्त्यांनी बांधली असली तरी आपल्या देशवासीयांनी तिच्यासाठी रक्त आणि घाम ओतला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर, सूत्रांची माहिती
  2. Parliament Special Session : रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Last Updated : Sep 19, 2023, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details