नवी दिल्ली Parliament Special Session 2023 :महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार हे मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. आरक्षण विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शविलाय.
Live updates
- विधेयकावर महाष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता आणि अनेक वर्ष स्त्रियांच्या चळवळीत सामाजिक काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष या नात्याने मी हे विधेयक मंजूर झाल्याचं स्वागत करते. जे मुद्देसमोर आले त्या मुद्द्यांमध्ये कोणांच श्रेय हा मुद्दा विचारात घेतला जातो आहे. परंतु हे होण्यासाठी 27 वर्षे लागले त्याच अपश्रेय कोणाचे आहे? याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची पुरुषप्रधान भूमिका आणि केवळ जिंकून येण्याला प्राधान्य हा निवडणुकीतला विचार याच्यामुळे आतापर्यंत खाचखळगे तयार झाले. परंतु याच्यामध्ये नवीन स्वरूप देऊन, नवीन नाव देऊन, नवीन आशय घेऊन त्याचं पॉलिसीमध्ये कसं रूपांतर करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत स्थान उपयुक्त राहील, स्त्रियांचं जीवन कसं सुधारता येईल असे मुद्दे जोडून घेऊन त्याच्या उद्दिष्टामध्ये हे आरक्षणाचा विधेयक आलेलx आहे.
- लोकसभेत मंजूर महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या की, हा आनंदी आणि भावनिक क्षण आहे. महिला आरक्षणांचं आम्ही स्वागत करतो.
- गायिका मालिनी अवस्थी म्हणाल्या, विरोधकांसह सर्व राजकीय पक्ष हे महिला आरक्षणासाठी एकत्र आले. हे जगासमोर मोठे उदाहरण आहे. ही खूप मोठी सुरुवात आहे. आमची खूप जुनी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी पंतप्रधान आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानते.
- लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मतदान केले. ते म्हणाले, भारतीय लोकसंख्येमध्ये 7% मुस्लिम महिला आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व 0.7% आहे. त्यामुळे आम्ही विरोधात मतदान केले आहे. ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी दोन खासदार संघर्ष करत आहेत, हे त्यांना कळावं म्हणून आरक्षणाविरोधात मतदान केलय.
- आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच कायद्यात रुपांतरण झालं आहे. 2 मते आरक्षणाच्या विरोधात पडली आहेत.
-
राहुल गांधी म्हणाले, एक मोठा घटक आरक्षणापासून वंचित आहे. या प्रक्रियेच्यावेळी राष्ट्रपतींनी सभागृहात असणं गरजेच होतं. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. नव्या संसदेत बोलण्याची संधी मिळाली आहे. नव्या संसदेत बोलताना आनंद होत असल्याचे काँग्रसेचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं. महिला आरक्षण विधेयक हा देशासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचं मोठा पाऊल होते. हे विधेयक आजपासून लागू व्हावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
- तुमचे शब्द कागद व भाषणापर्यंत मर्यादित न ठेवता कृतीने व्यक्त व्हा. नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा द्या, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत केले. महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) या बोलणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला आरक्षण विधेयकावरुन आता श्रेय लाटण्याची चढाओढ लागली आहे.
नवीन संसदेच्या इमारतीत सत्ताधाऱ्यांनी मांडलं विधेयक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत स्थलांतर केल्यानंतर पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सरकारनं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्याचा आरोप कपील सिब्बल यांनी मंगळवारी केला होता. तर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.