महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेत तरुणांची घुसखोरी प्रकरणात लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई; आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

Parliament Security Breach : लोकसभा सचिवालयानं 13 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेबाबत 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. यासोबतच लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधकांनी याप्रकरणावरुन चांगलाच गदारोळ केल्यानं लोकसभा आज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीय.

Parliament Security Breach
Parliament Security Breach

By ANI

Published : Dec 14, 2023, 12:51 PM IST

नवी दिल्ली Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयानं मोठी कारवाई केलीय. संसद भवन सुरक्षा कर्मचार्‍यांतील आठ सुरक्षा कर्मचार्‍यांना बुधवारी दोन संशयितांनी सुरक्षा घेरा तोडून लोकसभेच्या चेंबरमध्ये प्रवेश केल्याच्या घटनेवरुन निलंबित करण्यात आलंय. बुधवारी दोन संशयितांनी सुरक्षा घेरा तोडून लोकसभेच्या चेंबरमध्ये प्रवेश केला, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं : संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केलाय. बुधवारी, संसदेवर 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी, सुरक्षा भंगाची एक मोठी घटना समोर आली. जेव्हा लोकसभेच्या कामकाजादरम्यान, प्रेक्षक गॅलरीतील सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांनी सभागृहात उडी मारली आणि घोषणाबाजी केली. त्याच वेळी, अमोल शिंदे आणि नीलम देवी या अन्य दोन आरोपींनी संसदेच्या बाहेर डब्यातून रंगीत धूर सोडला आणि 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. सहा जणांनी मिळून या घटनेची योजना आखली असून हे चारही जण एकाच गटातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनेच्या संदर्भात UAPA आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विरोधकांचा संसदेत गदारोळ, लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब : संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन आज हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेत घडलेल्या घटनेवरुन विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या घटनेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काल सभागृहात जे काही घडलं त्याबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. सभागृहाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं.

कालच्या घटनेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची : लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात अराजकता पसरवू नका, असंही आवाहन केलंय. ते म्हणाले की, कालच्या घटनेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे. मी तुमच्याशी बसून चर्चा करेन. कालही चर्चा झाली. पुन्हा चर्चा करणार, सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही. सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही, आम्ही करुही देणार नाही, असंही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. संसदेत तरुणांची घुसखोरी प्रकरण : दिल्ली पोलिसांनी यूएपीए कायद्यांतर्गत केला गुन्हा दाखल, तरुणांची कसून चौकशी सुरू
  2. 'या' सहा जणांनी मिळून रचला कट, सोशल मीडियावरून होते संपर्कात
  3. संसदेत जाण्यापूर्वी पार करावे लागतात सुरक्षेचे चार स्तर, जाणून घ्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था

ABOUT THE AUTHOR

...view details