महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेची सुरक्षा भंग करणाऱ्या चार आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी - पटियाला हाऊस न्यायालय

Parliament Security Breach : संसद भवन आणि परिसरात गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पटियाला हाऊस कोर्टानं सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (14 डिसेंबर) या चारही आरोपींना पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं होतं. यावेळी पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयानं 7 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

Parliament Security Breach
Parliament Security Breach

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 7:12 PM IST

Updated : Dec 14, 2023, 7:50 PM IST

नवी दिल्ली Parliament Security Breach : संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं होतं. यावेळी पोलिसांनी चारही आरोपींना 15 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. दिल्ली पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितलं की, UAPA च्या कलम 16A (दहशतवादी कायद्या) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच चौकशीसाठी आरोपींना लखनौ, मुंबईला घेऊन जायचं आहे. त्यांनी लखनौहून शूज आणले होते, तर कलर स्मॉग मुंबईहून आणले होते.

आरोपींना मोफत कायदेशीर मदत : आरोपींनी कोर्टाकडं मोफत कायदेशीर मदतीची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करत कोर्टानं नवी दिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मोफत कायदेशीर मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी सागर शर्मा (26), मनोरंजन (34), अमोल शिंदे (25), नीलम (42) यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. नवीन संसद भवनात आरोपींनी गोंधळ घातल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दिल्ली पोलिसांनी UAPA कायद्याच्या कलम 120B, 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विविध ठिकाणी पोलिसांचे छापे : अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आरोपींची चौकशी करत असून, अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. स्पेशल सेलची डझनहून अधिक पथके वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाची दहशतवादी संघटनेच्या दृष्टिकोनातूनही चौकशी केली जात आहे.

आरोपींनी आधीच केली होती रेकी : संसदेची अभेद्य सुरक्षा भेदून बुधवारी (13 डिसेंबर) दोन जण संसदेच्या संकुलात घुसले होते. त्यापैकी दोघं संसदेबाहेर गोंधळ घालत होते. यात हरियाणातील नीलम, कर्नाटकातील मनोरंजन, महाराष्ट्रातील अमोल शिंदे, लखनौ येथील रहिवासी असलेल्या सागरचा समावेश आहे. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. सर्व संशयितांनी अनेक दिवसांपूर्वी ही योजना आखली होती, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. संसदेची रेकी केल्यानंतर, आरोपींनी 13 डिसेंबरची तारीख निवडली होती.

हेही वाचा -

  1. 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक
  2. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 : संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांचा गोंधळ; 14 खासदार निलंबित
  3. 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक
Last Updated : Dec 14, 2023, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details