लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब.
Monsoon Session Updates : लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब - राज्यसभा
18:40 August 05
लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
16:38 August 05
राज्यसभेचे कामकाज उद्या 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब
राज्यसभेचे कामकाज उद्या 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधी खासदारांकडून पेगासस प्रोजेक्ट आणि इतर विविध मुद्यांवर गोंधळ होत असताना कामकाज तहकूब करण्यात आले.
16:13 August 05
लोकसभेचे कामकाज 5 वाजेपर्यंत स्थगित
लोकसभेचे कामकाज 5 वाजेपर्यंत स्थगितकरण्यात आले आहे. पेगासस प्रोजक्टवर विरोधी खासदारांकडून निषेध होत असताना लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
15:42 August 05
लोकसभेचे कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित
विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचे कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित.
12:55 August 05
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित
11:43 August 05
लोकसभा आणि राज्यसभेत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण देशाला या यशाचा अभिमान असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.
11:43 August 05
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी पेगासस मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे. याचा अर्थ ते सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून या विषयावर चर्चेची मागणी करत आहेत.
07:11 August 05
Monsoon Session Updates : पावसाळी अधिवेशनाचा 14 वा दिवस; पेगासस प्रकरणावरून रणकंदन
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरुवात झाली आहे. पेगासस हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आजही संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात आतापर्यंत राज्यसभेत फक्त कोरोनावर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. तर लोकसभेमध्ये कोणत्याच विषयावर चर्चा झालेली नाही. केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कायदे पारित केले आहेत. विधेयक पारित होत आहेत. मात्र, चर्चा होत नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 19 जुलैपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदेचा जास्तीत जास्त वेळ हा गदारोळात गेल्याने प्रत्येक वेळी कामकाज तहकूब करावे लागले आहे.
विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. तर संसदेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. सरकार पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार झाल्यानंतरच संसदेतील गोंधळ संपेल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तर हा कळीचा मुद्दा नसून इतरही महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी आहेत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत म्हटलं. बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला, त्यामुळे सभापतींनी राज्यसभेच्या 6 खासदारांवर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली होती. याचा इतर विरोधी पक्षांकडून निषेध नोंदवण्यात आला.
संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार -
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. काही विधेयके सोडली, तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कामकाज झालेले नाही. पेगासस आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे आतापर्यंत संसदेचे कामकाज बाधित होत आहे. संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
हेही वाचा -संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?