महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Monsoon Session Updates : विरोधकांना पाहिजे काय? हे त्यांनाच स्पष्ट माहिती नाही - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर

Monsoon Session Updates
संसदेचे पावसाळी अधिवेशन

By

Published : Aug 4, 2021, 9:32 AM IST

Updated : Aug 4, 2021, 9:27 PM IST

18:07 August 04

विरोधकांना पाहिजे काय? हे त्यांनाच स्पष्ट माहिती नाही - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर

शेती कायद्यांबाबत सरकार पूर्णपणे पारदर्शक आहे. आम्ही राज्यसभा आणि लोकसभेत या मुद्द्यांवर 4 तास चर्चा केली. याबाबत आम्ही उत्तरे दिलीत. मात्र, विरोधकांना पाहिजे काय? हे त्यांनाच स्पष्ट माहिती नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी आज दिली.    

17:57 August 04

लोकसभेतील कामकाज 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब

लोकसभेतील कामकाज 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

17:57 August 04

लोकसभेत नारळ विकास मंडळ (सुधारणा) विधेयक, 2021 पास

लोकसभेत नारळ विकास मंडळ (सुधारणा) विधेयक, 2021 पास झाले आहे.    

17:52 August 04

राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, 2021 राज्यसभेत पास झाले आहे. सभागृहातील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

16:22 August 04

चर्चेसाठी सभागृहात आता एक व्यापक समज निर्माण झाला आहे - राज्यसभा सभापती

सभागृहाच्या नियमांनुसार, असे मुद्दे ज्यांना सरकार आणि विरोधक दोघांचीही सम्मती आहेत ते चर्चेसाठी घेतले जातात आणि त्यानुसार आपण एकापेक्षा जास्तवेळा दोन्ही बाजूंना सभागृहाच्या अजेंड्यावर काम करण्याचे आवाहन केले आहे, असे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले.

तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्न, किंमत वाढ आणि बेरोजगारी या विषयांवर चर्चा करण्यासाठी सभागृहात आता एक व्यापक समज निर्माण झाला आहे. या विषयांचे महत्व लक्षात घेता याबाबीचा फायदा घेतला पाहिजे, अशी, माहिती सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली.   

15:58 August 04

राज्यसभा सभापतींनी सभागृहात सामान्य स्थिती आणण्यासाठी नेत्यांना केले आवाहन

आज 12 व्या दिवशी राज्यसभेत व्यत्यत आल्याबद्दल सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी नेत्यांना सभागृहात सामान्य स्थिती आणण्यासाठी आवश्यक ते करण्याचे आवाहन केले. 

15:42 August 04

कामकाजात अडथळा न आणणाऱ्या सदस्यांच्या पक्षांची राज्यसभा सभापतींनी घेतली भेट

राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी अशा पक्षांची भेट घतेली ज्यांचे सदस्य कामकाजात अडथळा आणत नाही आहेत. त्याचबरोबर, ते सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची मागणी देखील करत आहेत.    

15:26 August 04

संसदेत चर्चेसाठी मुद्दे व्यापक सम्मतीनेच घेतले जाऊ शकतात - राज्यसभा सभापती

संसदेत चर्चेसाठी मुद्दे व्यापक सम्मतीनेच घेतले जाऊ शकतात, असे विधान राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. त्याचबरोबर, त्यांनी ज्या पक्षांचे सदस्य कामकाजात अडथळा आणत आहेत त्या पक्षांच्या नेत्यांची देखील भेट घेतली.     

11:32 August 04

संसदेत विरोधकांचा गदारोळ

10:35 August 04

मल्लिकाअर्जुन खरगे यांची केंद्रावर टीका

राहुल गांधी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. प्रादेशिक राजकारण विसरून सर्वांनी लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्यांसाठी एकत्र यावं, अशी विनंती त्यांनी राजकीय पक्षांना केली आहे. सभागृहात पेगासस, कृषी कागदे आणि इतर मुद्यांवरून चर्चा व्हायला हवी, असे मल्लिकाअर्जुन खरगे म्हणाले. 

विरोधक सभागृहाचे कामकाज बिघडवत आहेत, असे म्हणण्याचा नैतिक अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे का, असा सवाल त्यांनी केला. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती. तेव्हा ते सभागृहात गोंधळच घालत. तसेच सभागृहातील कामकाजात व्यत्यय घालून प्रश्न विचारणे लोकशाहीचे रक्षण करते, असे भाजपाचेच दोन मोठे नेते म्हणाले होते, असे मल्लिकाअर्जुन खरगे यांनी म्हटलं. 

10:23 August 04

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीपेगासस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला.

10:23 August 04

काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

10:23 August 04

टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

10:23 August 04

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यसभेत नियम 267 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला.

09:05 August 04

Monsoon Session Updates : पावसाळी अधिवेशनाचा तेरावा दिवस; संसदेत विरोधकांचा गदारोळ

नवी दिल्ली -  आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तेरावा दिवस आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी खासदारांनी मंगळवारी बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली. येत्या काळात सभागृहात पेगासस हेरगिरी, महागाई आणि कृषी कायदा हे मुद्दे मांडण्यासाठी विरोधकांची एकजूट कायम राहील, असे काँग्रेसने म्हटलं. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी खासदारांसाठी नाश्ता आयोजित केला होता. यावेळी 15 पक्षांचे 100 हून अधिक खासदार उपस्थित होते. या बैठकीच्या अनुषंगाने सभागृहात आज विरोधक भूमिका मांडतील.

आज संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. तर संसदेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच सरकार पेगासस मुद्यांवरही बोलण्यास तयार नसल्याचे विरोधी नेत्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस संसदेचे कामकाज चालू देत नसून फक्त गोंधळ घातल असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे.\

अधिवेशनात आतापर्यंत  राज्यसभेत फक्त कोरोनावर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. तर लोकसभेमध्ये कोणत्याच विषयावर चर्चा झालेली नाही. केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कायदे पारित केले आहेत. 19 जुलैपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदेचा जास्तीत जास्त वेळ हा गदारोळात गेल्याने प्रत्येक वेळी कामकाज तहकूब करावे लागले आहे. विशेष म्हणजे संसदेच्या एका मिनटाच्या कामकाजासाठी लाखो रुपये खर्च होतात.

संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार  -

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. काही विधेयके सोडली, तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कामकाज झालेले नाही. पेगासस आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे आतापर्यंत संसदेचे कामकाज बाधित होत आहे. संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा -संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

हेही वाचा -विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज पुन्हा स्थगित, राज्यसभेचे कामकाज सुरू

Last Updated : Aug 4, 2021, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details