महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pm Modi On Manipur Violence : मणिपूरमधील घटनेने हृदय हेलावले; अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेतील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला बोलताना दिला.

Pm Modi On Manipur Violence
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jul 20, 2023, 11:54 AM IST

नवी दिल्ली :मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची समाजकंटकांनी धिंड काढल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे देशातील 140 कोटी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अशा घटनांमुळे जगभरात देशाची नाचक्की होते. या घटनेमुळे हृदय हेलावले आहे. मनात प्रचंड संताप आहे. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणारा कोणताही गुन्हेगार असला, तरी त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिले. मणिपूर घटनेतील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मणिपूर घटनेतील गुन्हेगारांना सोडणार नाही :मणिपूर येथील घटनेतील पीडितांची धिंड काढल्याने हृदय हेलावले आहे. या घटनेतील पीडितांना न्याय देण्यात येईल. कोणत्याही सभ्य समाजासाठी ही लाजिरवानी बाब आहे. पाप करणारे आपल्या जागी आहेत. मात्र देशाची मान या घटनेमुळे शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे या घटनेतील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. कायदा पूर्ण शक्ती आणि सक्तीने योग्य ते पाऊल उचलणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला. महिलांवर अत्याचार करणाऱया कोणत्याही गुन्हेगारांना सोडू नका, असा दमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. कोणत्याही राज्यात महिलांवर अत्याचार होत असतील, तर सोडू नका असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकारण सोडून महिला अत्याचारावर कारवाई करा :मणिपूर घटनेमुळे जगभरात देशाची मान खाली गेली आहे. काही मुठभर लोकांमुळे देशाची जगात नाचक्की होत आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात महिलांवर अत्याचार होत असेल तर कठोर कारवाई करा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

हेही वाचा -

  1. Manipur Viral Video : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून बलात्कार; आरोपींच्या मुसक्या आवळण्याकरिता पोलिसांकडून प्रयत्न सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details