नवी दिल्ली :राष्ट्रीय महामार्गावर आता लोखंडाऐवजी बांबूपासून बनवलेल्या बाहुबलीचे संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नीतमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली. महामार्गाच्या कडेला लोखंडी जाळ्या असल्याने त्यांचा धोका वाहनधारकांना होता. मात्र बांबूच्या बाहूबल्लीचे संरक्षण दिल्याने यापासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. दुसरीकडे बांबूच्या जाळ्या इको फ्रेंडली असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. छत्तीसगडमध्ये प्रायोजिक तत्वावर हा प्रयोग करण्यात येणार असून त्यानंतर हा प्रकल्प देशभरात लागू करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाराष्ट्रातील खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.
काय आहे बांबूचा बाहुबली प्रकल्प :केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून महामार्गाच्या कडेला बांबूपासून बनवण्यात आलेल्या 'बाहुबली' या संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम करण्यात आले. हा प्रकल्प अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ या महामार्गावर 200 मीटरवर बसवण्यात आला. बांबूपासून बनवण्यात आलेल्या 'बाहुबली' संरक्षण जाळ्याचा चांगलाच लाभ होत असल्याचे दिसून आले. महामार्गावर जंगली श्वापदे येऊ नये, म्हणून या जाळ्यांचा चांगलाच उपयोग होत आहे. वाहनधारकांनाही याचा कोणताही धोका नाही.
लोखंडी जाळ्यापेक्षा किफायतशीर :बांबूच्या या 'बाहुबली' जाळ्या लोखंडी जाळ्यांपेक्षा किफायतशीर आहेत. लोखंडी जाळ्यांमुळे अपघातावेळी वाहनधारकांना जिविताला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र बांबूच्या संरक्षक जाळ्यामुळे कोणताही धोका होत नाही. उलट बांबूच्या जाळ्या पर्यावरणपूरक असून मजबूत असल्याचे दिसून येते.