महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Live Updates : संसदेचे पावसाळी अधिवेशन; कामकाज स्थगित - undefined

parliament
संसद

By

Published : Jul 30, 2021, 11:01 AM IST

Updated : Jul 30, 2021, 12:49 PM IST

12:17 July 30

लोकसभेचे कामकाज 2 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित

12:16 July 30

राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित

12:01 July 30

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात

11:47 July 30

लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

11:19 July 30

तर याबाबत उत्तर देताना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, जनवरी 2021 मध्ये सभी पोषण आहारासंदर्भात पौष्टिक आहाराचे वितरण करावे, खाण्याची टेस्टिंग करण्यात यावी, जिल्हा स्तरावर न्यूट्रिशनल समिती बनवावी, असे आदेश देण्यात आले होते. जर अशा प्रकारे काम होत नसेल तर त्याबाबत संबंधित मंत्रालयाला माहिती देण्यात यावी, त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. महिला व बालविकास मंत्री हे खासदारांच्या प्रश्नावर उत्तर देत आहेत.  

11:15 July 30

प्रधानमंत्री महिला शक्ति केंद्र योजना या योजनेशी संबंधित महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न केला. पोषण आहार योजनेशी संबंधित 13 जानेवारी 2021ला केंद्र सरकारने जो आदेश काढला होता त्या आदेशाचे सर्व राज्य सरकार पालन करत आहेत की नाही? कोणते राज्य पालन करत आहे आणि कोणते राज्य पालन करत नाही याबाबत माहिती त्यांनी मागितली. तसेच जे राज्य पालन करत नसेल त्यांच्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल? तसेच कोरोना काळात ज्यांनी आपले पती गमावले त्यांच्या महिलांना आणि त्यांच्या महिलांसाठी केंद्र सरकारने काय योजना आखली आहे? याबाबत माहिती मागितली. 

11:12 July 30

लोकसभेत प्रधानमंत्री महिला शक्ति केंद्र योजना या विषयावर चर्चा सुरू आहे. या विषयाशी संबंधित लोकसभा सदस्य आपले प्रश्न मांडत आहेत. त्यांच्या प्रश्नाला केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या उत्तर देत आहेत. 

11:10 July 30

  • राज्यसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

10:37 July 30

नवी दिल्ली -सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक पेगासस, कृषी कायदे यांवरुन सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तसेच सभागृहात गोंधळ घालत आहेत. 

Last Updated : Jul 30, 2021, 12:49 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details