महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब, अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ चालू असून आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. अदानीवरील हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्यासाठी जेपीसीच्या मागणीला सर्व सहभागी नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

Parliament Budget Session
अर्थसंकल्पीय अधिवेशन

By

Published : Mar 15, 2023, 11:16 AM IST

Updated : Mar 15, 2023, 11:39 AM IST

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या दुसरा टप्पा सुरु आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच ते दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आजही विरोधी पक्षातील सदस्य अदानी समूहाच्या मुद्द्यावर सरकारकडे जेपीसीची मागणी करत होते. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी समूहाच्या मुद्द्यावर राज्यसभेत नियम 267 अंतर्गत कामकाजावर निलंबनाची नोटीस दिली आहे.

राहुल गांधी परदेशातून परतले : याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांची आज बैठक होणार असून बैठकीत एकजूट कायम ठेवण्यासाठी भविष्यातील रणनीती ठरवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टी आणि बीआरएसचे खासदार संसद भवन ते ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. तसेच राहुल गांधी हे देखील परदेशातून परतले असून ते आज लोकसभेत कामकाजात भाग घेऊ शकतात.

खरगेंची मोदींवर टीका : संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'मला राहुल गांधींकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. पंतप्रधान मोदींनी 5 - 6 देशांमध्ये जाऊन आपल्या देशातील लोकांचा अपमान केला आणि भारतात जन्म घेणे पाप असल्याचे म्हटले. त्यांच्या कार्यकाळात देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमकुवत झाले आहे. खरे बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. हा लोकशाहीचा अंत नाही तर काय आहे?'

विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक : मंगळवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 16 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी झाले नाहीत. अदानीवरील हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्यासाठी जेपीसीच्या मागणीला सर्व सहभागी नेत्यांनी पाठिंबा दिला. काल काँग्रेस सरचिटणीस म्हणाले की, संसदेचे कामकाज न होण्याचे कारण म्हणजे सरकारने अदानीवरील हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्यासाठी जेपीसीची मागणी अद्याप मान्य केलेली नाही. ते म्हणाले की, पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक डायव्हर्जन तयार करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्च रोजी एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सुरू झाला. मात्र गेल्या दोन दिवसांत गदारोळामुळे एकाही सभागृहाचे कामकाज सुरुळीत झालेले नाही.

हेही वाचा :Thackeray Vs Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल करणार युक्तिवाद

Last Updated : Mar 15, 2023, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details