महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Budget Session 2023 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधानांचे राज्यसभेत आज उत्तर

संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी बुधवारी सांगितले.

Parliament Budget Session 2023
पीएम नरेंद्र मोदी

By

Published : Feb 9, 2023, 11:55 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. सभापती जगदीप धनखर यांनी बुधवारी सभागृहात जाहीर केले की पंतप्रधान मोदी उद्या दुपारी २ वाजता आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी वरिष्ठ सभागृहात चर्चा सुरू झाली. आज सभागृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास नसल्यामुळे सभेच्या सुरुवातीपासूनच चर्चा पुढे नेण्यात आली.

धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा बुधवारी संपली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 31 जानेवारी रोजी ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिले भाषण केले होते. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा बुधवारी संपली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले.

स्थिर, निर्भय, निर्णायक सरकार :संसदेच्या संयुक्त बैठकीला आपल्या पहिल्या भाषणात, द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात संरक्षण, अवकाश, महिला सक्षमीकरण आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी भाष्य केले. 'अमृत काल' दरम्यान लोकसहभागाचे महत्त्व यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. एक स्थिर सरकार , निर्भय, निर्णायक आणि कोणताही भेदभाव न करता सर्व वर्गासाठी काम करणारे हे सरकार असल्याचे त्या म्हणाल्या. 'विरासत' (वारसा) सोबत 'विकास' (विकास) वर भर देणे हा सर्वांची जबाबदारी आहे मुर्मू यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारच्या अथक लढ्याचे वर्णन करताना भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगितले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांची टीका : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी टीका केली. आदल्या दिवशी, लोकसभेत धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना, मोदी म्हणाले की राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना केलेल्या दूरदर्शी भाषणात देशाला दिशा दिली. द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने भारताच्या नारी शक्ती ला प्रेरणा दिली. भारतातील आदिवासी समुदायांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांच्यात अभिमानाची भावना निर्माण केली. पंतप्रधान म्हणाले की त्यांनी 'संकल्प से सिद्धी'ची विस्तृत ब्लू प्रिंट देशाला दिली. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामाबद्दलही सांगितले. जागतिक स्तरावर सर्व देश भारताबाबत सकारात्मकता असल्याचे त्यांनी सांगितले. देशात गरजेच्या सुधारणा बळजबरीने केलेल्या नाहीत तर खात्रीने केल्या गेल्या आहेत. भारत ही लोकशाहीची जननी आहे. सशक्त लोकशाहीसाठी विधायक टीका आवश्यक आहे आणि टीका ही शुद्धी यज्ञासारखी आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :Valentine Week : ...म्हणूनच 'चॉकलेट डे' साजरा केला जातो, वाचा चॉकलेटचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details