महाराष्ट्र

maharashtra

संसदीय समितीचे फेसबुकसह ट्विटरला समन्स;  हजर राहण्याचे आदेश

By

Published : Jan 18, 2021, 5:42 AM IST

लोकसभा सचिवालयाच्या नोटीसनुसार नागरिकांच्या हितसंरक्षणाचा समाजमाध्यमातील अधिकार आणि त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे प्रतिनिधीही स्थायी समितीसमोर हजर असणार आहेत.

संपादित
संपादित

नवी दिल्ली- संसदेच्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीने समाज माध्यम कंपनी फेसबुकसह ट्विटरला समन्स बजावले आहे. समाज माध्यमाचा गैरवापर रोखण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. या समन्सनुसार समाज माध्यम कंपनीच्या प्रतिनिधीला 21 जानेवारीला स्थायी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

लोकसभा सचिवालयाच्या नोटीसनुसार नागरिकांच्या हितसंरक्षणाचा समाजमाध्यमातील अधिकार आणि त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे प्रतिनिधीही स्थायी समितीसमोर हजर असणार आहेत. त्यासाठी 21 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश समाज माध्यम कंपनीला देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीत 31 सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष शशी थरुर आहेत. थरुर हे केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

हेही वाचा-फेसबुकने हटविले पेजचे लाईक; केवळ फॉलो करता येणार

यापूर्वीही संसदीय समितीने फेसबुकला बजावले होते समन्स-

फेसबुककडून भाजपच्या नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाई होत नसल्याचा अमेरिकेच्या एका कंपनीने आरोप केला होता. त्याची दखल संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष शशी थरुर यांनी 21 ऑगस्ट 2020 ला घेतली होती. या समितीने 2 सप्टेंबर 2020 ला फेसबुकच्या अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रतिनिधींनाही प्रश्न विचारले होते. समाज माध्यमांसह ऑनलाईन न्यूज मीडियाकडून होणारा गैरवापर थांबविणे आणि नागरिकांचे हितसंरक्षण करणे हा माहिती तंत्रज्ञान समितीचा चौकशीदरम्यानचा मुख्य हेतू होता.

व्हॉट्सअपच्या धोरणावरून फेसबुकवर होत आहे टीका-

व्हॉट्सअपने नुकतेच गोपनीयतेचे धोरण आणि अटीच्या बदलल्या आहेत. त्यामध्ये डाटावर करण्यात येणारी प्रक्रिया आणि फेसबुकसह माहिती एकत्रित करण्याचा समावेश आहे. वापरकर्त्यांना 8 जानेवारी 2021 पर्यंत अटी मान्य केल्या तरच व्हाट्सअपच्या सेवा मिळू शकणार असल्याचेही नोटिफेकेशनमध्ये म्हटले होते. मात्र, टीकेनंतर कंपनीने हा निर्णय स्थगित केला आहे.

हेही वाचा-फेसबुकवर डाटा शेअर करण्याकरता धोरणात बदल नाही-व्हॉट्सअप

ABOUT THE AUTHOR

...view details