महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Raghav Parineeti Wedding: परिणीती चोप्रा, राघव चड्ढा विवाहबद्ध! जाणून घ्या, त्यांचा आजचा रोमँटिक प्रवास - RaagNeeti romance timeline

Raghav Parineeti Wedding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचा आज उदयपूरमध्ये शानदार विवाह पार पडलाय. त्यांचा लग्नापर्यंतचा रोमँटिक प्रवास जाणून घेऊ या. (ragneeti wedding)

Raghav Parineeti Wedding
राघव परिणीतीचं लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 10:33 PM IST

Updated : Sep 24, 2023, 10:39 PM IST

हैदराबाद Raghav Parineeti Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं आज लग्न झालंय. परिणीतीनं या खास प्रसंगासाठी मनीष मल्होत्राचा लेहेंगा निवडला, तर राघव चड्ढा यांनी हस्तिदंती शेरवानी घातली होती. मे महिन्यामध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला होता. ते आज म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी विवाहबद्ध झाले आहेत. शनिवारी सकाळी चुडा समारंभ झाला. त्यानंतर दुपारी पाहुण्यांसाठी स्वागत जेवण झालं. लग्नापूर्वी शनिवारी रात्री 90 च्या दशकातील थीम असलेली पार्टीदेखील पार पडलीय. (celebrity wedding)

बॉलीवूड आणि प्रसिद्ध राजकारण्यांनी हजेरी :या शाही लग्नाला बॉलीवूड आणि दिग्गज, प्रसिद्ध राजकारण्यांनी हजेरी लावली होती. राघव चड्ढा यांच्या पालकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वैयक्तिकरित्या स्वागत केलं. लग्नाच्या एक दिवस आधी, सानिया मिर्झा, मनीष मल्होत्रा, भाग्यश्री आणि इतर उदयपूरमध्ये आल्याचं दिसलं. राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा हे दोघेही त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. परिणीतीनं हिंदी चित्रपट क्षेत्रात तिच्या कारकिर्दीत अनेक प्रशंसनीय कामगिरी केल्या आहेत, तर राघवचा लेखापाल ते आम आदमी पक्षाचा (AAP) सदस्य म्हणून सर्वात तरुण खासदार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

प्रेमकथा हायलाइट करणारी एक पोस्ट :या दोघांनी कधीही उघडपणे त्यांच्या नात्याची चर्चा केलेली नाही. परिणीतीनं यापूर्वी सोशल मीडिया पोस्टमध्ये 'एक' भेटल्याचा उल्लेख केला होता. परिणीतीनं तिच्या साखरपुड्यानंतर लगेचच तिची प्रेमकथा हायलाइट करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ती राघवच्या प्रेमात कशी पडली, हे त्यातून तिने सांगितलं होतं. (Parineeti Chopra Raghav Chadha married)

मोठ्या प्रमाणात डेटिंगच्या अफवा :काही महिन्यांपूर्वी, त्यांच्या एंगेजमेंटपर्यंतच्या आठवड्यात हे सेलिब्रिटी जोडपं अनेक वेळा एकत्र दिसलं होतं. या वर्षाच्या मार्चमध्ये, परिणीती आणि राघव मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्या पहिल्यांदाच एकत्र येण्यानं मोठ्या प्रमाणात डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी ते एका विमानतळावर एकत्र स्पॉट झाले. ते मोहालीमध्ये आयपीएल सामन्यात सहभागी होतानाही दिसले होते.

युनायटेड किंगडममध्ये शिक्षण :दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. परिणीती आणि राघव दोघांनीही युनायटेड किंगडममध्ये शिक्षण घेतले आहे. राघव प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होता, तर परिणीती मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिकत होती. त्यांची प्रेमकथा कथितपणे इम्तियाज अलीच्या चमकिलाच्या सेटवर सुरू झाली. पंजाबमध्ये चित्रीकरण करत असताना राघवने तिला एक मित्र म्हणून भेट दिली, नंतर डेटिंग करण्यास सुरुवात केली. वर्क फ्रंटवर, परिणीती दिलजीत दोसांझसोबत 'चमकिला'मध्ये दिसणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकीला या दोन प्रख्यात पंजाबी गायकांचा आहे. या चित्रपटात दिलजीत चमकीला तर परिणीती अमरजोतची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

  1. Raghav Parineeti Wedding: पाहा, परिणीती राघवच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडिओ
  2. Ragneeti Wedding : परिणीतीला सानियानं दिल्या हटके स्टाईल लग्नाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडिओ
  3. Ragneeti Weeding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा-आप नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले, चाहत्यांना फोटोची प्रतिक्षा
Last Updated : Sep 24, 2023, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details