महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Daughters Head Shaved: मुलीने केलं 'लव्ह मॅरेज'.. घरच्यांनी अपहरण करून मुलीचं केलं 'टक्कल'.. - पालकांनी मुलीचं मुंडन केलं

Daughters Head Shaved: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचं तिच्या पालकांनी अपहरण करून टक्कल Parents shaved daughters head केलं. तेलंगणातील जगतीयाल येथे ही घटना घडली. Daughters Head Shaved for Love Marriage

Parents shaved daughter's head for doing love marriage in jagtial of Telangana
मुलीने केलं 'लव्ह मॅरेज'.. घरच्यांनी अपहरण करून मुलीचं केलं 'टक्कल'..

By

Published : Nov 15, 2022, 1:36 PM IST

जगतियाल (तेलंगणा): Daughters Head Shaved: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या पालकांनी रागाच्या भरात मुलीला बेदम मारहाण केली. ती आपली मुलगी आहे हे विसरून सासरच्या घरातून तिचे अपहरण करण्यात आले. तिला जबर मारहाण करून गाडीत नेण्यात आले. रात्री त्यांनी तिला समजावून सांगितले मात्र, घरच्यांचे न ऐकल्याने मुलीचे मुंडन करण्यात Parents shaved daughters head आले. आई-वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराबाबत युवतीने पोलिस ठाणे गाठले आहे. Daughters Head Shaved for Love Marriage

जगतियाल ग्रामीण पोलिसांच्या अहवालानुसार, जगतियाल जिल्ह्यातील बालापल्ली ग्रामीण मंडळातील जक्कुला मधु (23) आणि रायकल मंडळाच्या इटिक्याला येथील जुव्वाजी अक्षिता (20) यांच्यात प्रेम होते. आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्यानंतर मुलीने गुपचूप लग्न केले. रविवारी सायंकाळी मधूच्या सासरच्या घरी असताना दोन कारमधून आलेल्या अक्षताच्या कुटुंबीयांनी तिच्या कुटुंबावर हल्ला केला आणि तरुणीचे अपहरण केले. त्यांनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बेदम मारहाण केली. तिने आरडाओरडा करूनही तिचे मुंडन केले

तरुणीने सोमवारी जगतियाल ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. एसआय अनिल यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत पीडितेला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. मुलीला आधीच तिच्या पतीकडे सोपवण्यात आले असून, तिच्या पालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details