हैदराबाद Parag Agarwal New Startup : ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांनी घेतल्यानंतर तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांनी 2022 मध्ये राजीनामा दिला होता. आता पराग अग्रवाल यांच्याशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. पराग अग्रवाल यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित स्टार्टअप सुरू केला आहे. त्यांच्या स्टार्टअपनं अलीकडेच तब्बल 30 दशलक्ष डॉलरचा निधी उभारलाय.
नवीन स्टार्ट्पसह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) जगात प्रवेश : ओपन एआयचे (open AI) सुरुवातीला निधी देणारे खोसला व्हेंचर्स यांनी पराग अग्रवाल यांच्या AI कंपनीला निधी दिलाय. पराग अग्रवाल एका नवीन स्टार्टअपसह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) जगात प्रवेश करत आहेत. या नवीन स्टार्टअपचं नाव आणि उत्पादन तपशील सध्या गुपित ठेवण्यात आलंय. मात्र प्राप्त माहितीनुसार पराग अग्रवालचा स्टार्टअप भाषेच्या मॉडेल्सच्या डेव्हलपर्ससाठी सॉफ्टवेअर तयार करत आहे.
कोट्यवधी रुपयांचं मिळालं फंडिंग :पराग अग्रवाल यांच्या स्टार्टअपला नुकतंच कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांनी स्वतःला AI च्या जगात एक नवोदित म्हणून प्रस्थापित केलंय. आगामी काळात ते AI च्या जगात स्पर्धक ठरु शकतात. त्यांच्या स्टार्टअपचं सध्याचं लक्ष्य भाषा मॉडेल्सवर आहे. हे भविष्यात AI विकास आणि विविध क्षेत्रातील अनुप्रयोगांच्या भविष्यावर परिणाम करु शकतं.
- 2022 मध्ये दिला होता राजीनामा : सोशल मीडिया ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी नोव्हेंबर 2021 मध्ये पायउतार झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता. नंतर 2022 मध्ये एलोन मस्कनं कंपनी ताब्यात घेईपर्यंत त्यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून काम केलं. एलोन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यावर अग्रवाल यांनी राजीनामा दिला होता.
हेही वाचा :
- Twitter To Pay Content Creators : आता कंटेन्ट क्रियटरला ट्विटर देणार पेमेंट, एलन मस्क यांनी 'इतक्या' निधीची केली तरतूद
- Twitter Offices Closed In India : एलन मस्कने भारतातील तीनपैकी दोन ट्विटरचे कार्यालय गुंडाळले, जाणून घ्या काय आहे कारण
- Elon Musk Twitter : इलॉन मस्क यांनी अधिकृतपणे ट्विटरची जबाबदारी स्वीकारली, पराग अग्रवाल यांची हकालपट्टी