कटक (ओडिशा) -अतागड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकत, तस्करांकडे असलेले पँगोलीन (खवले मांजर) पकडले होते. या मांजराला शनिवारी जंगलामध्ये सोडण्यात आले.
अतागड वनविभागाच्या अधिकारी अस्मिता लेंका यांनी सांगितले की, 'मागील एका वर्षात खवल्या मांजर तस्करी प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे.'
काही दिवसांपूर्वी आम्ही तस्करांकडून एका खवल्या मांजराला वाचवले होते. ते मांजर आजारी होते. म्हणून आम्ही त्याच्यावर योग्य ते उपचार करत त्याला निरिक्षणाखाली ठेवले होते. मांजराची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला जंगलामध्ये सोडण्यात आले, असे लेंका यांनी सांगितलं.