महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dhirendra Shastri Controversial Statement: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनीं महिलांची तुलना केली म्हशींशी.. म्हणाले, 'जीन्स, टीशर्ट संस्कृतीच्या विरोधात' - आमच्या म्हशी बिफोर टाइम माॅडर्न

राजधानी रायपूरमध्ये रामकथेदरम्यान बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महिलांच्या आधुनिक पेहरावावारुणव वादग्रस्त वक्तव्य केले. महिलांचे जीन्स टी-शर्ट घालणे संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर कमी कपडे घालणाऱ्या महिलांची तुलना त्यांनी म्हशींशी केली.

Pandit Dhirendra Krishna Shastri of Bageshwar Dham compared women wearing modern clothes to buffalo
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनीं महिलांची तुलना केली म्हशींशी.. म्हणाले, 'जीन्स, टीशर्ट संस्कृतीच्या विरोधात'

By

Published : Jan 24, 2023, 12:21 PM IST

Updated : Jan 24, 2023, 12:32 PM IST

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनीं महिलांची तुलना केली म्हशींशी..

रायपूर (झारखंड): राजधानी रायपूरमध्ये सुरू असलेल्या रामकथेच्या शेवटच्या दिवशी कथा सांगत असताना पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे कपडे परिधान करणाऱ्या महिलांवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या बालपणीची गोष्ट सांगताना शास्त्रींची जीभ घसरली. कमी कपडे किंवा जीन्स टी-शर्ट घालणाऱ्या महिलांची तुलना म्हशींशी करण्यात आली. ते म्हणाले की कमी कपडे घालणे हे आधुनिक युग असेल, तर आमच्या म्हशी फार पूर्वीपासून आधुनिक आहेत. त्या तर कपडेही घालत नाहीत.

आमच्या म्हशी 'बिफोर टाईम मॉडर्न' : कथा सांगत असताना महिलांच्या आधुनिक पेहरावावर भाष्य करताना पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आमच्या म्हशी पूर्वीपासून मॉडर्न आहेत. त्या काही घालत नाहीत. त्या तर लंगोटही घालत नाही. म्हशी काळाच्या आधी मॉडर्न झालेल्या आहेत. आता त्यांना आधुनिक काळापूर्वी मॉडर्न झाल्या आहेत असे म्हणाल का?, असा सवालही पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी उपस्थित केला.

आजही आपण आपल्या आईच्या पदराला हात पुसतो: धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आजही आपल्याला आठवते की आपण घरी गेल्यावर जेवण झाल्यावर आईच्या मांडीवर हात पुसतो. कदाचित हे सौभाग्य आता अनेक लोकांना मिळत नाही. तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा टॉवेल असेल तर तुमच्या शेजारी ठेवा मात्र आईच्या साडीच्या पदराचा आनंद इतरत्र कुठेही मिळणार नाही. आजही मला आईच्या पदराचा गोड सुगंध आठवतो. आमच्या भारतीय माता ज्या साडी नेसतात. त्यांच्याकडे पर्याय आहे की, आमच्यासारख्या नालायक मुलांकडे तोंड पुसण्यासाठी आजही आईचा पदर आहे. पण जीन्स आणि टी-शर्ट घालून बाहेर पडणाऱ्या बायकांमुळे नवीन मुलांना हे सौभाग्य मिळत नाही.

मातृत्वाच्या भावनेबद्दल अपार आदर : मात्र, हे प्रकरण हाताळताना शास्त्री म्हणाले की, आम्ही महिलांच्या पेहरावावर भाष्य करत नाही. आधुनिक युग आहे, असे म्हणणाऱ्या काही माता आढळून येतात. तुम्ही इतर लोकांकडे बोट दाखवता. पण आमचीच बहीण असे कपडे घालत असेल तर मात्र आम्ही काही बोलत नाही. जर कमी कपडे घालणे म्हणजे आधुनिक जीवनशैली आहे, तर आपल्या म्हशी फार पूर्वीच आधुनिक झालेल्या आहेत. आम्ही टिप्पणी करत नाही, आम्ही आमचे विचार व्यक्त करतो. आम्हाला मातृत्वाच्या भावनेबद्दल अपार आदर आहे कारण भारत हा मातृप्रधान देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Bageshwar Dham Maharaj बागेश्वर धाममध्ये येतात भूत प्रेतांची बाधा झालेल्या महिला व पुरुष मग होतं असं की

Last Updated : Jan 24, 2023, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details