नवी दिल्ली :भारतीय समूह शापूरजी पालोनजी समुहाचे अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री यांचे सोमवारी रात्री वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत निधन ( Pallonji Mistry passes away ) झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या उद्योगपतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. "श्री पल्लोनजी मिस्त्री यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग जगतात अतुलनीय योगदान दिले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि असंख्य हितचिंतकांना माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.
थोडक्यात माहिती :1929 मध्ये जन्मलेल्या मिस्त्री यांना उद्योगपती म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई-मुख्यालय असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना 1865 मध्ये झाली. बांधकाम, रिअल इस्टेट, कापड, इंजिनियरिंग वस्तूंचे व्यवहार, गृहोपयोगी उपकरणे, शिपिंग, प्रकाशने, उर्जा आणि जैवतंत्रज्ञान. मिस्त्री हे टाटा समूहातील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. ज्यात एकूण 18 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. त्यांचे वडील शापूरजी पालोनजी यांनी 1930 मध्ये टाटा सन्सचे शेअर्स विकत घेतले होते.