इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी आघाडीने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव रविवारी पहाटे यशस्वी झाला. त्यामध्ये नॅशनल असेंब्लीच्या बहुसंख्य सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. (Pakistan's national assembly) नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. (Defeat of Imran Khan in no-confidence motion) अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. आता इम्रान खान यांचे सरकार पडल्यावर पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होणार आहेत. पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.
पंतप्रधान इम्रान खानविरोधात अविश्वास प्रस्ताव -पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये 172 बहुमत आहेथ. पीटीआयच्या नेतृत्वाखालील युती 179 सदस्यांच्या पाठिंब्याने तयार झाली होती, (Pakistan's Prime Minister Imran Khan) ज्यामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य होते. पीटीआयने आपला प्रमुख सहयोगी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) गमावल्यानंतर आणि विरोधी पक्षाने 8 मार्च रोजी पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खानला मोठा धक्का बसला होता.
अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश - नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने पाकिस्तान सरकार पाडण्याच्या कटात परदेशी हात असल्याचे सांगत (3 एप्रिल)रोजी अविश्वास प्रस्ताव नाकारला होता. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हा देण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उपसभापतींची ही कृती देशाच्या संविधानाचे उल्लंघन असल्याचे घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्लीला शनिवारी सभागृहाचे अधिवेशन बोलावून अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर हे मतदान पार पडले. त्यामध्ये इम्रान खान यांनी बहुमत गमावले.
मध्यरात्री इम्रान खान पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले - यानंतर आता संविधानिक प्रक्रिया आणि नियमांनुसार, सभागृह अविश्वास प्रस्तावाचा निकाल राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असून नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. मात्र, अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवलेले इम्रान खान हे पहिले नेते आहेत. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री इम्रान मतदानापूर्वीच पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.