अमृतसर : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील अटारी-वाघा सीमेवर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. सदर व्यक्ती गेट क्रमांक जवळून तारेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान सुरक्षा दलांनी पाकिस्तानी नागरिकाला पाहिले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की,यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तो पाकिस्तानातील नांगल येथील रहिवासी असल्याचे या नागरिकाने पोलिसांना सांगितले. ड्रग्जच्या नशेत सीमा ओलांडून भारतात आला.