पटियाला (पंजाब) - 75 वर्षांपूर्वी भारताच्या फाळणीच्या वेळी कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुमताज यांची भारतात राहणाऱ्या भावांशी भेट झाली ( Mumtaz meets her brothers after 75 years ) आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील करतारपूरमध्ये त्यांची त्यांच्या भावांशी भेट झाली.
फाळणीत झाली होती ताटातूट - फाळणीच्या काळात ही शीख महिला तिच्या कुटुंबापासून विभक्त झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुमताज बीबी यांचा जन्म शीख कुटुंबात झाला. फाळणीच्या वेळी हिंसक जमावाने मुमताजच्या आईची हत्या केली होती. त्यावेळी आईच्या मृतदेहावर ती लहान मूल पडून होती. या स्थितीत तिला मुहम्मद इक्बाल आणि अल्ला राखी नावाच्या जोडप्याने दत्तक घेतले आणि त्यांनी तिला आपली मुलगी म्हणून वाढवले. तिचे नाव मुमताज बीबी ठेवले. फाळणीनंतर इक्बाल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील वारिका तियान गावात स्थायिक झाला.
फाळणीत वेगळी झालेली मुमताज 75 वर्षांनी भेटली आपल्या भावांना हेही वाचा -धक्कादायक : डिझेल टॅंकर आणि ट्रकची भीषण धडक; अपघातात 9 जण जागीच जळून खाक
सोशल मीडियातून घेतला परिवाराचा शोध - इक्बाल आणि त्याच्या पत्नीने मुमताजला ती आपली मुलगी नसल्याचे सांगितले नाही. दोन वर्षांपूर्वी इक्बालची तब्येत अचानक बिघडली आणि त्याने मुमताजला सांगितले की, ती आपली खरी मुलगी नसून ती शीख कुटुंबातील आहे. इक्बालच्या मृत्यूनंतर मुमताज आणि त्याचा मुलगा शाहबाज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्याला मुमताजच्या खरे वडिलांचे नाव आणि भारतीय पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील गाव (सिद्राना) माहीत होते. जिथून तिच्या पालकांना फाळणीच्या वेळी त्यांचे वडिलोपार्जित घर सोडण्यास भाग पाडले गेले होते.
हेही वाचा -Kolhapur Girl Climbed Everest : एव्हरेस्ट सर करणाऱ्या कस्तुरीला आर्थिक संकट; परतीचा प्रवासाला पैसे नसल्याने निघाली चालत
75 वर्षांनी भेटली हरवलेल्या भावांना - सोशल मीडियावर शोध घेत असतानाच एके दिवशी दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि तिथून संवादाला सुरुवात झाली. अशा प्रकारे दोन्ही कुटुंबे जवळ आली. त्यानंतर मुमताजचा भाऊ गुरमीत सिंग, नरेंद्र सिंग आणि अमरिंदर सिंग कुटुंबातील इतर सदस्यांसह करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये पोहोचले. दुसऱ्या बाजूने मुमताजही आपल्या कुटुंबीयांसह करतारपूरला पोहोचली. अशा प्रकारे 75 वर्षांनंतर ती तिच्या हरवलेल्या भावांना भेटली.
हेही वाचा -Unique Marriage Proposal : कोल्हापुरात विवाहासाठी तरुणाचे असेही हटके प्रपोज, चर्चा तर होणारच...