महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistani Infiltrator : सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक - भारत पाकिस्तान सीमेवरून घुसखोराला अटक

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला पकडले आहे. हा घुसखोर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे.

Pakistani Infiltrator
पाकिस्तानी घुसखोर

By

Published : Apr 5, 2023, 5:33 PM IST

अहमदाबाद (गुजरात) : गुजरातमधील बनासकांठा येथे भारत - पाकिस्तान सीमेवरून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा घुसखोर नडाबेटजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी बीएसएफच्या जवानांनी या पाकिस्तानी घुसखोराला पकडले. दयाराम असे या घुसखोराचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहेत. तो ताराच्या कुंपणावरून उडी मारून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.

बीएसएफने दिले बयान : मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी नागरिकाला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना पकडले. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील बॉर्डर आउट पोस्ट (बीओपी) नडेश्वरीजवळील गेटवरून तो खाली उतरत होता. त्यावेळी त्याला पकडण्यात आल्याचे बीएसएफने सांगितले. बीएसएफ गुजरात फ्रंटियरने एका निवेदनात म्हटले आहे की, दयाराम पाकिस्तानचा रहिवासी असून त्याला कुंपणाच्या गेटवर चढून भारतीय बाजूस प्रवेश करताना पकडण्यात आले.

सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया : भारत - पाक सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सतत चालू असतात. गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानी घुसखोर सातत्याने भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी राजस्थानच्या गगानगर जिल्ह्यातील अनुपगडजवळ बीएसएफ जवानांनी एका घुसखोराला ठार केले होते. हा घुसखोर भारतीय हद्दीत बराच खोलवर घुसला होता. बीएसएफ जवानांना तो दिसताच त्यांनी त्याला थांबण्याचे आवाहन केले, मात्र त्याने पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांनी त्याच्यावर गोळीबार करून त्याला ठार केले.

पंजामधून दोन घुसखोरांना पकडले : गेल्या महिन्यात पंजाबच्या गुरुदासपूरमधून बीएसएफ जवानांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांना पकडले होते. जवानांना एका घुसखोराला गुरदासपूर सेक्टर तर दुसऱ्या घुसखोराला फिरोजपूर सेक्टरमधून पकडण्यात यश मिळाले आहे. बीएसएफ जवानांनी या घुसखोराकडून पाकिस्तानी चलन देखील जप्त केले आहे. त्यांच्यावर भारतीय सीमांच्या उल्लंघना अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा :Bandi Sanjay Detained : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details