महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistani drone In Akhnoor : BSF अखनूर सेक्टरमध्ये ड्रोनच्या घिरट्या, सुरक्षा दल सतर्क - अखनूर सेक्टर

अखनूर सेक्टर परिसरात पहाटे सव्वाचार वाजता अखनूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना ( BSF ) पाकिस्तानी ड्रोन घिरट्या ( Pakistani drone In Akhnoor ) मारत असल्याचे दिसले. त्यानंतर बीएसएफने अनेक राऊंड फायर केले आणि ड्रोन परतले.

Pakistani drone In Akhnoor
Pakistani drone In Akhnoor

By

Published : Jul 23, 2022, 1:25 PM IST

श्रीनगर : जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोनची हालचाल पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 4.15 च्या सुमारास बीएसएफला ( BSF ) कानुचक अखनूर सेक्टर परिसरात काही हलक्या हालचाली झाल्याचा संशय आला. ते ड्रोन ( Pakistani drone In Akhnoor ) असल्याचे नंतर कळले. त्यानंतर बीएसएफने अनेक राऊंड फायर केले आणि ड्रोन माघारी फिरले. पाकिस्तानी ड्रोन 300 मीटर उंचीवर उडत होते. काही आठवड्यांपूर्वी जम्मूच्या अखनूर भागात बीएसएफला 800 मीटर उंचीवर ड्रोन उडताना दिसले होते.

जवानांचा गोळीबार -अखनूर सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांना ड्रोन दिसल्यानंतर त्यांनी लगेचच त्या दिशेने गोळीबार केले. त्यानंतर पाकिस्तानी ड्रोन माघारी फिरला. यापूर्वी बीएसएफने कठुआ जिल्ह्यात बॉम्बसदृश वस्तू घेऊन जाणारे ड्रोन पाडले होते. स्थानिक लोकांनी ड्रोन पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर तो पाडण्यात आला. कठुआ जिल्ह्यात सापडलेले ड्रोन बीएसएफने पाडले, पण अखनूर सेक्टरमध्ये फक्त दोन राउंड फायर केले त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने गेला. सीमेपलीकडून ड्रोन येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

हेही वाचा -एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले - भाजप नेते चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details