गुरदासपूर (पंजाब) : पंजाबच्या गुरुदासपूरमधील कमालपूर चौकीजवळ काल रात्री 10.10 वाजता बीएसएफच्या जवानांना एक संशयास्पद ड्रोन दिसला. जवानांनी ड्रोनवर गोळीबार करताच ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतला. यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. (Pakistani drone carrying heroin seized). त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 2 किलोमीटर अंतरावर सैनिकांनी सुमारे एक किलोग्रॅम हेरॉइन वाहून नेणारे जुने तुटलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त केले. (drone carrying heroin seized near Gurdaspur border).
Pakistani Drone Seized : गुरदासपूर सीमेजवळ हेरॉइन वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन जप्त - गुरदासपूर सीमेजवळ ड्रोन जप्त
पंजाबच्या गुरदासपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 2 किलोमीटर अंतरावर BSF जवानांनी सुमारे एक किलोग्रॅम हेरॉइन वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन जप्त केले. (drone carrying heroin seized near Gurdaspur border). अमृतसरमधील डाओके पोलिस चौकीजवळ ही घटना घडली आहे. हा ड्रोन भारतीय सीमा चौकी ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत 20 मीटर आत पडल्याचे आढळला. (Pakistani drone carrying heroin seized).
सेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानचे हे ड्रोन पाडले. अमृतसरमधील डाओके पोलिस चौकीजवळ ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. हा ड्रोन भारतीय सीमा चौकी ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत 20 मीटर आत पडल्याचे आढळला. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'ड्रोनविरोधी उपाययोजना केल्यानंतर त्या ड्रोनने काही मिनिटांसाठी आकाशात उड्डाण केले आणि नंतर परतताना जमिनीवर पडले. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या बाजूने काही टाकण्यात आले आहे का, याचा तपास सुरू आहे.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फाजिल्का जिल्ह्यातील गट्टी अजयब सिंग गावाजवळील भारत-पाक सीमेवरील कुंपणाच्या दोन्ही बाजूंना काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सैन्याला सतर्क करण्यात आले. त्यांनी सांगितले की बीएसएफ जवानांनी सीमेच्या कुंपणाजवळ पाकिस्तानी तस्करांवर गोळीबार केला. मात्र, दाट धुक्याचा फायदा घेत तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले.