महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Baramulla Encounter : पाकिस्तानी जवानांनी दहशतवाद्याला कव्हर फायरिंग दिली, सैन्याच्या ब्रिगेडियरचा गंभीर आरोप - काश्मीरमधील बारामुल्ला नियंत्रण रेषा

Baramulla Encounter : बारामुल्ला जिल्ह्यात एलओसी ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाला पाकिस्तानी सैन्यानं कव्हर फायरिंग दिलं. त्यामुळे त्याचा मृतदेह सैन्याला सापडू शकला नाही.

Brigadier PMS Dhillon
ब्रिगेडीयर पीएमएस ढिल्लन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 11:52 AM IST

बारामुल्ला Baramulla Encounter : भारत-पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद पाकिस्तान प्रायोजित असल्याचा आरोप भारतानं वारंवार केलाय. आता त्या आरोपांना पुष्टी मिळाली असून दहशतवाद्यांप्रती पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. पाकिस्तानी सैन्यांनी सीमेवर कव्हर फायरिंग करत दहशतवाद्यांची मदत केली, असं ब्रिगेडीयर पीएमएस ढिल्लन यांनी सांगितलं.

पाकिस्तानच्या चौकीतून सतत गोळीबार :काश्मीरमधील बारामुल्ला नियंत्रण रेषेजवळ (LOC) भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या बुधवारपासून चकमक सुरू आहे. शनिवारी (१६ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत सैन्याच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. यापैकी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून, तिसऱ्याचा मृतदेह सीमेजवळ पडला होता. मात्र पाकिस्तानच्या चौकीतून होणाऱ्या सततच्या गोळीबारामुळे सुरक्षा दलाला तो मृतदेह सापडला नाही. पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना मदत करत कव्हर फायरिंग केली. पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर पीएमएस ढिल्लन यांनी ही माहिती दिली आहे.

बारामुल्ला हा नियंत्रण रेषेजवळ वसलेला जिल्हा आहे. येथून अनेकदा दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करतात. शनिवारी सकाळी ऑपरेशन सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच तिन्ही दहशतवादी मारले गेले. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या चौकीतून भारतीय सैन्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह मिळू शकला नाही. - पीएमएस ढिल्लन, पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर

दहशतवाद्यांचा मोठा साठा जप्त : चकमकीच्या ठिकाणाहून एक एके ४७, ७ मॅगझिन, चिनी पिस्तूल, ग्रेनेड, पाकिस्तानी चलन आणि पाच किलो आयईडी जप्त करण्यात आली आहे. हे तेच क्षेत्र आहे जिथे सुरक्षा दलांनी डिसेंबर २०२२ मध्ये दहशतवाद्यांच्या एका मोठ्या अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर एका गुहेतून शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. गेल्या सहा दिवसांतील सुरक्षा दलांची ही तिसरी चकमक आहे. १२ सप्टेंबर रोजी राजौरीमध्ये २ दहशतवादी मारले गेले, तर १ जवान शहीद झाला. अनंतनागच्या कोकरनाग जंगलात १३ सप्टेंबरपासून चकमक सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत ४ जवान शहीद झाले आहेत. येथेही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं
  2. Anantnag Martyr Funeral : कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौंचक यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार, मोठ्या संख्येनं जनसमुदाय उसळला
  3. Anantnag Encounter : हुतात्मा मेजर आशिष धौंचक पुढील महिन्यात येणार होते रजेवर, पण...

ABOUT THE AUTHOR

...view details