जम्मू काश्मीर - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून काश्मिरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मोर्टार शेल आणि तोफांनी पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या या आगळीकीला तत्परतेने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले.
काल (शुक्रवारी) सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. त्यामुळे सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यासोबतच काश्मिरातील नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला. याआधी २२ डिसेंबरला पाकिस्तानने मानिकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला होता.