नवी दिल्ली - पाकिस्तान सरकार मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांना भारताच्या ताब्यात कधी देणार? इंटरपोलच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेल्या पाकिस्तानच्या फेडरल एजन्सीच्या (एफआयए) संचालकांनी या प्रश्नावर मौन बाळगले. भारतासोबतच्या प्रत्यार्पण कराराच्या पुढे जाण्याच्या प्रश्नावरही ते काहीही बोलला नाहीत.
25 वर्षांनंतर भारतात इंटरपोलची आमसभा होत आहे. भारतात शेवटची बैठक 1997 मध्ये झाली होती. दिल्लीतील ही बैठक 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून यामध्ये 195 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आज मंगळवार (दि. 18 ऑक्टोबर)रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध शिकार आणि संघटित गुन्हेगारी हे मानवतेसाठी जागतिक धोका असल्याचे वर्णन केले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.