दुबई: रविवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी दुखापतीमुळे सुपर-4 मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर ( Shahnawaz Dahani out of match against India ) पडला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहनी दुखापतीमुळे आशिया चषक 2022 च्या सुपर 4 फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. हा वेगवान गोलंदाज साइड स्ट्रेनमुळे या सामन्याला मुकणार आहे. तसेच पुढील 2-3 दिवस वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल.
आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) च्या भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीची ( Pakistan fast bowler Shahnawaz Dahani ) दुखापत ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाही. दहाणी 2 सप्टेंबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती.