इस्लामाबाद ( पाकिस्तान ) : पाकिस्तानने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा ( 2008 Mumbai terrorist attacks ) मास्टरमाईंड, लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) दहशतवादी साजिद मीर ( Lashkar-e-Taiba Sajid Mir ) याला एका दशकानंतर अटक केली ( Pakistan arrested mastermind ) आहे. मीरच्या अटकेच्या अफवा ऑनलाइन प्रसारित झाल्या आहेत परंतु, त्याची पडताळणी झाली नाही. दरम्यान, न्यायालयाने त्याला १५ वर्षे शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (Financial Action Task Force ) च्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या वॉचलिस्टमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. देशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मापदंडांची पूर्तता न केल्यामुळे सध्या पाकिस्तान वॉचडॉगच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये आहे.
लष्कर ए तोयबा ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तान अनेक वर्षांपासून मीर याची उपस्थिती नाकारत आहे आणि एकदा तो मेला असल्याचा दावाही केला होता, असे निक्की एशियाने वृत्त दिले आहे. साजिद मीर हा माणूस एफबीआयच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे, त्याच्या डोक्यावर USD 5 दशलक्ष बक्षीस आहे. अनेक वर्षांपासून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी त्याचा शोध घेतला आहे. मीडिया पोर्टलशी केलेल्या संभाषणात, पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री, हम्माद अझहर म्हणाले की, पाकिस्तानने मीर आणि इतर दहशतवाद्यांविरोधात उपाययोजना केल्या. ज्या FATF साठी समाधानकारक होत्या. शिवाय, निक्की एशियाशी बोलताना एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मीर पाकिस्तानमध्ये "जिवंत, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे".