नवी दिल्ली- पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांकडून स्फोटके व हत्यारे जप्त केली आहेत. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. पोलिसांकडून दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे.
सणासुदीतील बॉम्बस्फोटाचा उधळला डाव हेही वाचा-मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मिळणार उपनिषदासह पुराणाचे धडे!
2 जणांनी पाकिस्तानमधून दहशतवादाचे घेतले प्रशिक्षण-
डीसीपी प्रमोद कुशावहा यांच्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये पोलिसांचे ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर हे दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून सहांहून अधिक आरोपींना अटक झाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार अटकेमधील 2 जणांनी पाकिस्तानमधून दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आहे. ओसामा आणि जावेद अशी अटकेतील या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा-दहशतवाद्यांचा ग्रेनेडने पुलावामात सुरक्षा दलावर हल्ला; चार नागरिक जखमी
दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम दहशतवाद्यांना करत होता ऑपरेट-
नीरज ठाकूर म्हणाले, की गुप्तचर विभागाकडून विविध राज्यांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या ऑपेरशनमध्ये सकाळपासून काही राज्यांमध्ये छापे टाकले होते. सर्वात प्रथम समीर या आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर दिल्लीमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. युपी एटीएसच्या मदतीने तीन जणांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी हे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये बंदूक चालविणे आणि स्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासमवेत सुमारे 12 बांगलादेशी नागरिकांनीही प्रशिक्षण घेतले आहे. सीमेजवळ दोन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. पहिल्या टीमला दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम ऑपरेट करत होता. या ऑपरेशनला अनीस आर्थिक रसद पुरवित होता.
दहशतवाद्यांची दुसरी टीम घडवून आणणार होती बॉम्बस्फोट-
दुसरी टीम ही महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट करणार होती. हे स्फोट नवरात्र आणि दिवाळीच्या दरम्यान करण्याचा डाव होता. स्फोट हे गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणार होते. तर हत्यारांच्या मदतीने काही बड्या लोकांची हत्या करण्याचा डाव होता. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता.
दाऊदच्या हस्तकांनी भारतात पोहोचविली हत्यारे
दहशतवाद्यांकडून रेकीला सुरुवात करण्यात आली नव्हती. अटकेमध्ये जीशान आणि ओसामा यांचा समावेश आहे. जान मोहम्मद शेख हा महाराष्ट्रामधील रहिवाशी आहे. तर ओसामा हा जामिया नगरचा रहिवाशी आहे. मूलचंद हा रायबरेली, जीशान कमर हा अलाहाबाद तर अबू बकर हे दिल्लीमध्ये राहणारा होता. त्याशिवाय अमीर जावेद हा लखनौचा रहिवाशी आहे. हे लोक मानसिकदृष्ट्या खूप रागीट वृत्तीचे आहेत. त्यामुळे त्यांनी दहशतवादाची वाट पकडली होती. दाऊदच्या हस्तकांनी भारतात हत्यारे पोहोचविली होती. त्यांना पाकिस्तानमधून हँडल करण्यात येत होते.
हेही वाचा-मोदी सरकामध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी
दरम्यान, मुंबईवर 26 नोंव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनाही पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिल्याचे तपासात समोर आले होते.