श्री गंगानगर ( राजस्थान ) : रविवारी सकाळी बीएसएफने 24 वर्षीय पाकिस्तानी नागरिक रिझवान अश्रफ याला हिंदुमलकोट सेक्टरमधील खाखान चेक पोस्टवर भारतीय हद्दीत प्रवेश करताना ( Pak Infiltrator In Sriganganagar )पकडले. आतापर्यंतच्या सर्व गुप्तचर यंत्रणांच्या चौकशीत या घुसखोराने नुपूर शर्मा मारण्याच्या उद्देशाने प्रवेश केल्याची कबुली दिली ( Pak Infiltrator wants to Kill Nupur Sharma ) आहे. त्यामुळे चौकशी सुरू असल्याचे श्री गंगानगरचे एसपी आनंद शर्मा यांनी सांगितले.
आणि ब्रेनवॉश झाला!: एसपीच्या म्हणण्यानुसार- त्याने म्हटले आहे की, भारतात येण्याचा त्याचा हेतू नुपूर शर्माला मारण्याचा होता. नुपूर शर्माने वादग्रस्त विधान केल्यामुळे ( Nupur Sharma Row ) तो दुखावला गेला होता. त्याने सांगितले की, हे वक्तव्य मीडियाद्वारे व्हायरल झाल्यानंतर मुल्ला मौलवींनी पाकिस्तानच्या मंडी भाऊद्दीन जिल्ह्यात एक बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील मौलवींनी आजूबाजूच्या सर्व गावात घोषणा देऊन पंचायत बोलावली. ज्यामध्ये नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यामुळे प्रभावित होऊन या तरुणाने भारतात घुसखोरी करत नुपूर शर्माला मारण्याचा कट रचला.
गुगल मॅपवरून मार्ग शोधला : अश्रफने आपली योजना पूर्ण करण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. या तरुणाला आधी आपल्या घरातून मंडी भाऊद्दीनहून लाहोरमार्गे भारतात प्रवेश करायचा होता. पण लाहोरमधून घुसखोरी करण्यात तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर दुसरा मार्ग शोधला. त्यानंतर साहिवालमार्गे जिल्ह्यातील हिंदूमलकोट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सीमेवरील बीएसएफ जवानांनी त्याला पकडले.