महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशाच्या कालाहांडीतील 'पॅड वुमेन'

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचा बाऊ न करता, उलट त्या काळात महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी कालाहांडी येथील भुवनेश्वर बेहरा युवा संघटनेने पुढाकार घेतला आहे.

pad women from kalahandi odisha
ओडिशाच्या कालाहांडीतील 'पॅड वुमेन'

By

Published : Nov 11, 2020, 5:57 AM IST

कालाहांडी (ओडिशा) - आजकाल महिलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. घरासोबतच बाहेरची कामेही महिला सक्षमपणे करु लागल्या आहेत. दिवसरात्र कुटुंबातील सर्वांच्याच सुख-दुःखाची काळजी घेणाऱ्या या महिला, मासिक पाळीतील आपल्या वेदना मात्र लपवून ठेवतात. याबाबतीत कित्येक सामाजिक संस्थांनी आणि सरकारनेही जागरुकता मोहिमा सुरू केल्या आहेत. मात्र. अद्यापही पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन, म्हणजेच पॅडचा वापर करण्याचे प्रमाण फारच कमी आहे.

कालाहांडीतील 'पॅड वुमेन'

कालाहांडीतील'अशी'एक संघटना ...

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचा बाऊ न करता, उलट त्या काळात महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी कालाहांडी येथील भुवनेश्वर बेहरा युवा संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेतील ९० हून अधिक महिला आणि विद्यार्थिनी सॅनिटरी नॅपकीन तयार करतात आणि ग्रामीण भागामध्ये ते वापरण्यासंबंधी जनजागृतीही करतात.

राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील जवळपास ६२ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. तसेच सॅनिटरी नॅपकीन वापरण्याबद्दल माहिती नसल्याने ५२ टक्के मुलींना आपले शिक्षणही सोडावे लागते. या सर्व समस्या ओळखून भुवनेश्वर बेहरा युवा संघटनेने ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छतेबद्दल जागरुक करण्याचे काम हाती घेतले. यासोबतच ते महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांना उपजिविकेची साधने पुरवण्यासाठी काम करत आहेत. याचाच परिणाम म्हणून या संघटनेकडून तयार करण्यात आलेले सॅनिटरी पॅड्स केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्याबाहेरही पाठवण्यात येत आहेत.

हेही वाचा -झारखंडमधील महिला उद्योजकांची भरारी; 'पलाश'चे पदार्थ पोहोचणार जगभरात!

संघटनेचे उद्दिष्ट्य काय?

या संघटनेचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, हळूहळू येथील मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅड वापरण्याचे महत्व समजू लागले आहे. यासोबतच संघटनेची इच्छाशक्ती पाहता नाबार्डने त्यांच्या प्रशिक्षणाच्या सुविधेच्या तयारीत मदतीचा हात दिला आहे. पूर्ण जिल्ह्यात अशा कार्यक्रमांची सुरुवात करणे हे या संघटनेचे उद्दीष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details