नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार पीटी उषा यांनी आज बुधवार जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटल्या. यादरम्यान त्यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांची भेट घेतली. 23 एप्रिलपासून कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंने जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. या कुस्तीपटुंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
याठिकाणी पीटी उषा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने : पैलवानांना भेटण्यासाठी पीटी उषा जंतरमंतरवर आल्या होत्या. पीटी उषा यांनी सुमारे ४० ते ४५ मिनिटे कुस्तीगीरांशी संवाद साधला. पीटी उषा मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे न देता निघून गेल्या. अनेकवेळा प्रसारमाध्यमांनी त्यांना या संभाषणाबद्दल प्रश्न केला. तुमचा त्यांच्याशी काय संवाद झाला असे प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी त्याला काहीही उत्तरे दिले नाहीत. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी मौन बाळगले. दुसरीकडे, जंतरमंतरवर उपस्थित लोकांनी पीटी उषा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ त्यांनी स्वतः महिला असून, आमच्या मुलींच्या विरोधात विधान कसे केले ते सांगितले. त्यांना लाज कशी वाटत नाही असे म्हणत याठिकाणी पीटी उषा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.