नवी दिल्ली -देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगवान आणि सुरळितपणे करण्यासाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. मात्र, रेल्वेकडून वाहतूक होणाऱ्या ऑक्सिजन टँकरमधून गळती होत असल्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे. ही घटना राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शनवर घडली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची गळती सुरू असताना रेल्वे वेगाने धावत होती.
देशभरात अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा न झाल्याने रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत रेल्वेकडून ऑक्सिजन टँकरची वाहतूक होताना निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही दिसून आला आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. तर दुसरीकडे ऑक्सिजनची गळती होताना निष्काळजीपणा दिसत आहे. सुत्राच्या माहितीनुसार ही मालगाडी ऑक्सिजन टँकर घेऊन अहमदाबादला जात होती.
हेही वाचा-गुरुग्राम : आयसीयूमध्ये मृत कोरोना रुग्णांना सोडून डॉक्टर फरार; सहा दिवसांनंतरही कारवाई नाही