गोपालगंज ( पाटना ) - बिहारमध्ये कधी पूल तर कधी रेल्वे इंजिन चोरीला जातो. मात्र यावेळी चोरट्यांनी चक्कर रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप ( thieves snatched the oxygen pipe ) पळवून नेले. सुदैवाने एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हता. पाईप कापण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला आहे. ऑक्सिजन पाईप चोरीला गेल्याने आपत्कालीन वॉर्डसह 105 खाटांचा ऑक्सिजन पुरवठा ( oxygen pipe theft from Gopalganj ) ठप्प झाला आहे.
चोरीच्या घटनेने रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे दणाणले - बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील सदर रुग्णालयाला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. येथे चोरट्यांनी ऑक्सिजन प्लांटजवळ पडलेला गॅस पाईप चोरून पळ ( bihar theft oxygen pipe in hospital ) काढला. ही चोरी उघडकीस येताच रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे ( oxygen gas pipe theft In Gopalganj ) दणाणले. ऑक्सिजन प्लांटचे कॉपर पाईप ( Oxygen supply to 105 beds ) खूप महाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
मॉडेल हॉस्पिटलची स्थिती- गोपालगंज रुग्णालय हे चांगल्या सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. ते ISO द्वारे प्रमाणितदेखील आहे. असे असूनही हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. ऑक्सिजन गॅस पाईप चोरीला गेल्याने दोन दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनसाठी ओरड सुरू आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असलेले अनेक रुग्ण आहेत. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ३० निवृत्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. असे असतानाही चोरट्यांनी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पाईप गॅस कापून नेले.
चोरी प्रकरण दडपण्यात व्यवस्थापन गुंतले - सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, रुग्णालय व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तीचाही या चोरीत हात असू शकतो. रुग्णालय व्यवस्थापनही चोरीचे हे प्रकरण दडपण्यात व्यस्त आहे. एकही अधिकारी स्पष्टपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अद्याप याप्रकरणी तपास पथक स्थापन करण्यात आलेले नाही. याबाबत रुग्णालयाचे उपअधीक्षक एस.के.गुप्ता यांना विचारले असता, त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत ‘चोरी झाली असेल तर उत्तर देऊ’, असे सांगितले.