नवी दिल्ली - कोविड आणि हवामान संकटामुळे दर मिनिटाला 11 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या महामारीतील मृत्यूच्या तुलनेत हा दर जास्त आहे, असे ऑक्सफॅम अहवलात म्हटलं आहे. कोरोना पेक्षा उपासमार जास्त घातक ठरू शकते, असा इशारा वर्ष 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमने आपल्या 'द हंगर व्हायरस' या अहवालात दिला होता. यावर्षी अन्नधान्याच्या असुरक्षिततेचा सामना 2 कोटी लोकांना करावा लागत आहे. कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून, दुष्काळसदृश परिस्थितीत जगणार्या लोकांची संख्या सहापट वाढून 5,20,000 पेक्षा जास्त झाली आहे.
उपासमारी तीव्र पातळीवर गेली आहे. इथिओपिया, मेडागास्कर, दक्षिण सुदान आणि येमेनमध्ये दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देणार्या लोकांची संख्या 5,21,814 पर्यंत पोहोचली आहे. 2021 च्या अखेरीस अत्यंत गरीबीत राहणाऱया लोकांची अंदाजे संख्या 745 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. महामारीचा प्रसार झाल्यापासून यात 100 मिलियनची वाढ झाली आहे. 2.7 बिलियन लोकांना महामारीत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक आर्थिक मदत मिळालेली नाही.