महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Owaisis challenge to Rahul : राहुल गांधींनी वायनाडऐवजी 'या'ठिकाणाहून निवडणूक लढवावी; ओवेसी यांचं चॅलेंज - तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका जवळ

Owaisis challenge to Rahul : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि पक्षाचे हैदराबादेतले खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना केरळमधल्या वायनाड या सध्याच्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिलाय. पण हे करताना ओवेसी यांनी राहुल गांधी यांना मतदारसंघ सुचवत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधी यांनी मैदानात यावं आणि आपल्याविरुद्ध लढावं, असं थेट आव्हान त्यांनी दिलंय. गांधी यांना औवेसी यांना राहुल गांधी काँग्रेसच्या तिकिटावर कुठून लोकसभा निवडणूक लढवावी, असं वाटतं हे या बातमीतून जाणून घ्या.

Owaisis challenge to Rahul
Owaisis challenge to Rahul

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 11:01 AM IST

Updated : Sep 25, 2023, 12:12 PM IST

हैदराबाद Owaisis challenge to Rahul : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहेत. राहुल गांधी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक केरळमधल्या वायनाडऐवजी हैदराबादमधून लढवण्याचं थेट आव्हान दिलंय. ओवेेसींनी रविवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलंय. ओवेसींनी या सभेत बाबरी मशिदीचा मुद्दाही उपस्थित केला.

बाबरी मशिदीवरून काँग्रेसवर हल्ला : काँग्रेसवर हल्ला करत ओवेसी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत काँग्रेसच्या राजवटीत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. यावरून त्यांनी राहुल गांधींचं नाव घेत ओवेसी म्हणाले की, त्यांनी वायनाडऐवजी हैदराबादमधून निवडणूक लढवावी, असं खुलं आव्हान देत असल्याचं ओवेसी म्हणाले. तुम्ही मोठमोठी विधानं करता, हिंमत असेल तर मैदानात या आणि माझा सामना करा, असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय.

तिन्ही पक्ष एकत्र काम करतात : तेलंगणात काँग्रेस आणि एआयएमआयएम आमनेसामने असून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीवर पोहोचण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, तेलंगणातील तुक्कुगुडा येथे एका सभेत बोलताना, तेलंगणात भारतीय जनता पार्टी, भारत राष्ट्र समिती आणि एआयएमआयएम एकजुटीने काम करत आहेत. कॉंग्रेस या तिघांच्या विरोधात लढत असल्याचं राहुल गांधी त्या सभेत म्हणाले होते. त्या सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, 'तेलंगणात काँग्रेस पक्ष बीआरएसविरोधात लढत नाही, तर बीआरएस, भाजपा आणि एआयएमआयएम एकत्र आहेत. सर्व पक्ष वेगवेगळे असले तरी एकदिलाने काम करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव किंवा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सीबीआय-ईडीचे कोणतेही खटले नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपली माणसं मानतात, असा दावाही राहुल यांनी केला होता.

वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका :तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस येथे निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी पूर्ण होत आलीय. सत्ताधारी बीआरएस त्यांच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतंय. त्याचवेळी काँग्रेसनंही सहा हमीभाव जाहीर केले आहेत, काँग्रेस सत्तेत आल्यास हे पूर्ण केले जातील असं काँग्रेसनं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Asaduddin Owaisi Buldhana: ओवेसी यांच्या सभेमध्ये खरीच औरगंजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाली का? 'या' अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा
  2. MP Owaisi On UCC: औरंगाबाद दौऱ्यात समान नागरी कायदाबाबत खासदार ओवेसी साधणार संवाद
  3. Owaisi on Kolhapur Riots: मग गोडसे कुणाची औलाद... ओवैसींचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल
Last Updated : Sep 25, 2023, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details