कोलकाता- पश्चिम बंगाल राज्यात यावर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. हुगळी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बाबत मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. बंगाल राज्यात एमआयएम आता तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि डाव्या पक्षांनाही टक्कर देणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा -
अब्बास सिद्दीकी या मुस्लीम नेत्यांशी आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. बंगाल विधानसभा निवडणुका लढणार असल्याची घोषणा एमआयएमने नुकतीच केली. त्यानंतर ओवैसी यांचा हा पहिलाच बंगाल दौरा आहे. ओवैसी यांना बंगाल दौरा गुप्त ठेवायचा होता. कारण, राज्य सरकारला जर दौऱ्याची माहिती झाले असती तर त्यांना कोलकाता विमानतळावरून बाहेर पडू दिले नसते. विमानतळावरून ते थेट हुगळी येथे अब्बास सिद्दीकी यांना भेटण्यास गेले. दुपारी ते पुन्हा हैदराबादला माघारी रवाना होणार आहे. एमआयएमचे बंगाल राज्याचे सचिव झमीरुल हसन यांनी पत्रकारांना सांगितले.