नवी दिल्ली - लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्ती विधेयकावर खासदार असुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर उपहासात्मक टीका केली. मोदी सरकारला ओबीसी समाजाचे हित करायचे नाही. सरकार का घाबरत आहे, प्यार किया तो डरना क्या? सरकारचे प्रेम हे 20 टक्केवाल्यांसाठी आहे.
खासदार असुद्दीन ओवैसी म्हणाले, की ओबीसी समाजाला 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्याची सुवर्णसंधी आहे. त्यासाठी इम्पेरिकल पुरावा आहे. मागासवर्गांची यादी धर्मनिरपेक्ष करण्याची गरज आहे. मंत्रालयांमध्ये एकही ओबीसी सचिव नाही. केंद्रीय विद्यापीठांमध्ये ओबीसींच्या 51.6 टक्के जागा रिक्त आहेत. केवळ मराठा आरक्षणावर चर्चा केली जाते. पण, महाराष्ट्रातही मुसलमानांची स्थिती खराब आहे. मोदी सरकार हे बेरोजगार, मागास लोकांसाठी नाही. तर ताकदवान लोकांसाठी आहे, अशी टीका ओवैसी यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा-कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती
ओवैसी यांनी मिर्झा गालिब यांचा शेरही वाचून दाखविला. ओवौसी म्हणाले. 'गालिब ने बड़ा खूब कहा था, 'ये जो तमाशा मैं देखता हूं, ...दुनिया मेरे आगे होता है शब-ए-रोज, तमाशा मेरे आगे'