नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी हिंदुत्व आणि लिंचिंगसंदर्भात विधान केले. यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. सोमवारी सकाळी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी संरसंघचालकांच्या विधानावर भाष्य केले. ओवैसी यांनी टि्वट केले आहे. 'हा द्वेष हिंदुत्वाची देण आहे. (लिंचिंग) हे गुन्हेगार हिंदुत्व सरकारच्याच आश्रयात आहेत, असे औवेसी यांनी म्हटलं.
लिंचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना गाय आणि म्हशीचा फरक कळत नाही. परंतु त्यांना मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पेहलु, रकबर, अलीमुद्दीन यांची नावे पुरेशी आहेत. हा द्वेष हिंदुत्वाची देणगी आहे. (लिंचिंग) हे गुन्हेगार हिंदुत्व सरकारच्याच आश्रयात आहेत, असे टि्वट ओवेसी यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते अलीमुद्दीनच्या मारेकऱयांना पुष्पहार घातला जातो. अखलाकच्या मारेकऱयांला तिरंग्यात ठेवले जाते. आसिफच्या मारेकऱयांच्या समर्थनार्थ एक महापंचायत बोलावली जाते. तिथे भाजपा कार्यकर्ते आम्ही खून करू शकत नाही का, असा सवाल करतात. भ्याडपणा, हिंसाचार आणि हत्या हे गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. मुसलमानांची लिंचिंग देखील याच विचारसरणीचा परिणाम आहे, असे औवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटलं.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यारून टीका केली. पाच राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भागवत भाष्य करत आहेत. भाजपा आता सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे. लोकांनी सावध व्हावे, असे ते म्हणाले.