महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

OWAISI APPEALS PEACEFUL FRIDAY PRAYERS शुक्रवारची नमाज शांततेत करण्याचे एआयएमआयएम प्रमुख ओवेसींचे आवाहन - शुक्रवारची नमात शांततेत करण्याचे आवाहन

एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी AIMIM chief Asaduddin Owaisi यांनी आज हैदराबादमध्ये शुक्रवारची नमात शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. याआधी गुरुवारी, प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या निलंबित नेत्याच्या कथित वक्तव्यानंतर तेलंगणात निदर्शने सुरू झाली होती.

Owaisi
Owaisi

By

Published : Aug 26, 2022, 12:09 PM IST

हैदराबाद एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी AIMIM chief Asaduddin Owaisi यांनी आज नागरिकांना शुक्रवारची नमात शांततेत करण्याचे आवाहन केले आणि प्रेषित मोहम्मद यांच्यावरील कथित वक्तव्याप्रकरणी भाजप नेते टी राजा सिंह यांना ताब्यात घेण्याची आणि निलंबित करण्याची त्यांची सर्वात मोठी मागणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. याआधी गुरुवारी, प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या निलंबित नेत्याच्या कथित वक्तव्यानंतर तेलंगणात निदर्शने सुरू झाली.

हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, सिंह यांना प्रतिबंधात्मक अटकाव कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना चेरियापल्ली येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर ओवेसी यांनी म्हटले आहे की, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, शुक्रवारच्या नमाजानंतर अशा घोषणा देऊ नका, ज्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होईल. आपली सर्वात मोठी मागणी त्याला अटक करण्याची पीडी कायद्यानुसार पूर्ण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जातीय गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या निलंबित भाजप नेत्यावर 101 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, टी. राजा सिंह यांना 1986 च्या अधिनियम क्रमांक 1 अंतर्गत म्हणजेच पीडी कायद्यानुसार 25 ऑगस्ट रोजी हैदराबाद शहराच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, सिंह नेहमी प्रक्षोभक भाषणे देत होते आणि दोन समुदायांमध्ये वैर पसरवत होते. सिंग यांनी YouTube वर जारी केलेल्या व्हिडिओचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहर आणि तेलंगणाच्या इतर भागांमध्ये निदर्शने झाली. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केली आणि हैदराबाद आणि तेलंगणातील शांतता बिघडली.

हेही वाचाTwin tower Noida demolition in nine seconds नोएडामधीलट्विन टॉवर फक्त नऊ सेकंदात उद्ध्वस्त होणार

ABOUT THE AUTHOR

...view details